पुणे

दुर्दैवी ! शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा ‘लाल चिखल’

अमृता चौगुले

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  'कांद्याने केला वांदा अन् टोमॅटोचाही झाला चिखल,' असं म्हणण्याची वेळ खेड तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. केंद्र सरकारच्या वक्रदृष्टीमुळे कांदा व टोमॅटो कवडीमोल भावात विक्री करावा लागत असतानाच टोमॅटोच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. किलोला 180 रुपयांप्रमाणे असलेल्या टोमॅटोच्या दराला आता प्रतिकिलोस 3 ते 4 रुपये असा कवडीमोल भाव आला आहे. चाकणमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटोला 5 रुपये किलो असा दर मिळत आहे. तेजीत असणा-या टोमॅटोचा बाजार नीचांकी पातळीवर घसरला आहे.

संबंधित बातम्या : 

केंद्राची नेपाळी टोमॅटोची आयात शेतकर्‍यांना भोवली, असा सूर उमटू लागला आहे. शासनच्या धोरणाने शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा मलाल चिखलफ झाला आहे. बाजारात येणारी विक्रमी आवक टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांच्या अक्षरशः मुळावर उठली आहे. साधारण महिना-दीड महिन्यांपूर्वी सफरचंदापेक्षा जादा म्हणजे तब्बल 150 ते 200 रुपयांपर्यंत गेलेला टोमॅटोचा दर सध्या घाऊक बाजारात 3 ते 4 रुपये आणि किरकोळ बाजारात पाच ते सहा रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

वाहतूक खर्च निघत नसल्याने काही शेतकर्‍यांनी टोमॅटो बाजारात विक्रीसाठी न पाठवण्याची भूमिका घेतली आहे. मागच्या महिन्यात खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये सरासरी 2600 ते 2800 रुपये प्रतिकॅरेट दराने विकला गेलेला टॉमेटो सध्या 80 ते 120 रुपये प्रतिकॅरेटवर आला असल्याचे अडत्यांनी सांगितले. टोमॅटोच्या दरात घसरण होत असताना सरकार याकडे लक्ष देणार का? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

SCROLL FOR NEXT