कोल्हापूर : टोमॅटोचे दर घसरले: शेतकरी हवालदिल

कोल्हापूर : टोमॅटोचे दर घसरले: शेतकरी हवालदिल

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : तब्बल तीन महिन्यानंतर टोमॅटोच्या अचानक घसरलेल्या दरामुळे शेतकरी आणखी एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटो पिकावर नांगर फिरवू लागले आहेत. टोमॅटोला किलोला ५ रुपये दर मिळल्याने अकिवाट येथील सुभाष खुरपे या शेतकऱ्याने अडीच एकरातील टोमॅटोची बाग उपटून टाकत संताप व्यक्त केला.

शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल. या अपेक्षेने लाखो रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड केली. 100 एकरात शिवम ज्वारी जातीचे गावरान टोमॅटोची लागवड केली आहे. योग्य नियोजन करून टोमॅटोचे मोठे उत्पादन घेतले. मात्र, टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पिकलेला मालासह टोमॅटोची रोपे शेतकरी तोडून टाकत आहेत. दर घसरल्याने झालेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी आहे.

जुलै महिन्यात टोमॅटोला सर्वसाधारण किलोला 250 ते 300 रुपये बाजारभाव मिळत होता. ऑगस्ट महिन्यात हाच बाजारभाव होता. हा दर दिवाळीपर्यंत असाच राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. परंतु आवक वाढल्यानंतर बाजारभाव कमी होत गेला.  आज लिलावात जवळपास 4 ते 5 रुपये किलोला बाजारभाव मिळाला. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. शिरोळ तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोची शेती करत आहेत. शेतकऱ्यांना अनेकदा चढ-उताराचा सामना करावा लागला आहे. कोरोना, अतिवृष्टी त्यानंतर बदललेल्या हवामानाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

जुलै महिन्यात टोमॅटोला सर्वात उच्चकी 250 ते 300 रुपये दर मिळत होता. हा दर दिवाळीपर्यंत राहील, अशी अपेक्षा होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात 1 लाख 75 हजार रुपये खर्चून टोमॅटोची लागवड केली. उत्पादित माल मार्केटात घेऊन गेल्यानंतर आवक वाढल्याने दर घसरला. त्यामुळे उत्पादन खर्च निघत नसल्याने टोमॅटो पीक काढून टाकले.
सुभाष खुरपे, शेतकरी, अकिवाट (ता. शिरोळ)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news