पुणे

रुग्णसंख्या वाढीने चाचणी केंद्रांची संख्या वाढवली

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्णांसह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आाहे. त्यामुळे तातडीने आरटीपीसीआर व रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट चाचणी व्हावी म्हणून महापालिकेने शहरात एकूण 24 चाचणी केंद्र सुरू केले आहेत.

ती चाचणी मोफत केली जाणार आहे. कोरोनासदृश लक्षण असलेल्या नागरिकांनी तातडीने जवळच्या केंद्रांवर जाऊन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

चाचणीसाठी इंडियन मेडिकल असोशिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन, पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन आणि सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिकांचे सहाय घेण्यात येत आहे.

खासगी रूग्णालय व दवाखान्यात घेण्यात आलेल्या आरटीपीसआर नमुन्यांची तपासणी वायसीएम किंवा नवीन भोसरी रुग्णालयातील प्रयोगशाळेतून करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

आकुर्डीतील ह.भ.प. प्रभाकर कुटे रुग्णालय, जुने आकुर्डी रुग्णालय, शाहूनगरचे आरटीटीसी सेंटर, संभाजीनगरचे साई अंब्रेला दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, म्हेत्रेवस्ती दवाखाना, रुपीनगर दवाखाना, तळवडे दवाखाना, चिंचवड गावातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, पुनावळेतील ओजस हॉस्पीटल, रावेतमधील भोंडवे कॉर्नर, चिंचवडमधील गावडे पेट्रोल पंप, पिंपरी कॅम्पातील जुने व

नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपळे सौदागर दवाखाना, पिंपरी गावातील कर्मवीर भाऊराव पाटील शाळा, थेरगाव रुग्णालय, खिंवसरा पाटील रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, सांगवीतील इंदिरा गांधी प्रसुतीगृह, पिंपळे गुरवमधील बॅडमिंटन हॉल, जुने भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, वाय.सी.एम.रुग्णालय, खराळवाडी दवाखाना येथे आरटीपीसीआर केंद्र आहेत.

https://youtu.be/Qjmx0ZJ6Xx4

SCROLL FOR NEXT