पुणे

पिंपरी : श्रावणमासातील पूजेसाठी बाजारपेठ फुलली

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्रावणातील सत्यनारायणाच्या पूजनासाठी बाजारपेठेत विविध पूजा साहित्याची आवक झाली आहे. श्रावणातील पूजेला महत्त्व असल्याने बाजारपेठेला बहर येऊ लागला आहे. श्रावणमासाला प्रारंभ झाल्यापासून बाजारात फळे, फुले आणि हारांची आवक वाढू लागली आहे. महिलावर्गाकडून अधिक खरेदी होऊ लागली आहे. विशेषत: पूजा-अर्चा आणि धार्मिक विधीसाठीच्या साहित्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पूजेचे साहित्य तेजीत असल्याचे दिसत आहे.

विविध प्रकारचे चौरंग

सत्यनारायण पूजेसाठी लागणारे चौरंगाचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. यामध्ये लाकडी, प्लायवुड, मिनार काम केलेले तर अगदी हौशी लोकांसाठी चांदीचे आवरण असलेले चौरंग उपलब्ध आहेत. तसेच फळ व फुलांची मागणी वाढली आहे. विशेषत: पूजेचे साहित्य, पाने, फळे, फुले, हारांना मागणी वाढली आहे. केळीचे खुंट मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत.

उपवासाचे पदार्थ

विशेषत: श्रावणात उपवास करणार्‍यांची संख्या अधिक असल्याने साबुदाणा, वरई, राजगिरा लाडू, शेंगदाणे आणि फळांना विशेष मागणी आहे. किरकोळ बाजारात अगरबत्ती, कापूर, कापूस, वात, केळीची पाने, हार, फुले, विड्याची पाने यांची रेलचेल पाहावयास
मिळत आहे.

फळ खरेदीला पसंती

फळे खरेदीलाही पसंती दिली जात आहे. उपवास आणि पूजेसाठी केळी सीताफळ, सफरचंद, पेरू, डाळिंब, मोसंबी, चिकू, अननस फळांना मागणी आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT