Teacher  Pudhari
पुणे

Maharashtra Teacher Recruitment: शिक्षक भरतीला पुन्हा मुदतवाढ; ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती ३० जूनपर्यंत नोंदवता येणार

शाळा व्यवस्थापनांना रिक्त पदांची माहिती अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ; शिक्षण विभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत पवित्र संकेतस्थळावर रिक्त पदांच्या जाहिराती नोंदविण्या साठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शाळा व्यवस्थापनांना ३० जूनपर्यंत जाहिराती नोंदवता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येते. त्यानुसार २०२५ ची पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे.

याअंतर्गत शिक्षक पदभरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ही मुदत संपुष्टात आली. परंतु, अद्यापही काही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांनी त्यांच्या अखत्यारीतील शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी https:///mahateacher recruitment.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच जाहिरात देण्यास काही अडचणी असल्यास edupavitra25 @gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT