Pune Illegal Weapons: पुण्यात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची धडक मोहीम; १५ दिवसांत १७ जण अटकेत

१२ गावठी पिस्तुले, १३ जिवंत काडतुसे जप्त; सहा महिन्यांत ८७ गुन्हे, १६१ आरोपींना अटक
Gun
GunPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांच्या विरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १५ दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत अवैध शस्त्रे बाळगणारे, खरेदी-विक्री करणारे अशा १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Gun
PMC Schools Partnership: महापालिकेच्या ५ शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’कडे; ९ ऐवजी ३ वर्षांचा प्रायोगिक करार

या कारवाईदरम्यान १२ अवैध गावठी पिस्तुले आणि १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. संबंधित आरोपींविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते १५ जून २०२६ या कालावधीत कालेपडळ, भारती विद्यापीठ, डेक्कन, मांजरी, नांदेड सिटी, फुरसुंगी, सहकारनगर, येरवडा आणि लोहगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे तसेच छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली.

Gun
Pune Water Supply: पुण्यात सम-विषम पाणीपुरवठ्याचा पहिलाच दिवस; कमी दाबाच्या तक्रारींनी नागरिक त्रस्त

काही प्रकरणांत आरोपींकडून एकापेक्षा अधिक शस्त्रे आणि काडतुसे जप्त करण्यात आली असून, शहरात अवैध शस्त्रांची उपलब्धता अद्यापही कायदा व सुव्यवस्थेसाठी गंभीर आव्हान असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. गेल्या १५ दिवसांत समोर आलेल्या १० प्रकरणांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.

Gun
Shivare Land Acquisition: शिवरेतील शेतकऱ्यांवर भूसंपादनाची कुऱ्हाड; आर्थिक कणा मोडल्याची भावना

तपासात जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर गंभीर गुन्ह्यांसाठी होऊ शकला असता, असे समोर आले आहे. शस्त्रे शहरात कोणत्या मार्गाने पोहोचत होती आणि त्यामागे नेमके कोण सक्रिय आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, आगामी काळातही ही कारवाई सुरू राहणार असून, अवैध शस्त्रांच्या व्यापाराशी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Gun
Maharashtra Youth Gutkha Addiction: गुटखा सिंडिकेटचा विळखा; तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत, कॅन्सरचा धोका वाढला

सहा महिन्यांत ६७ गुन्हे; ९६ पिस्तुले जप्त

पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १५ जून २०२६ या कालावधीत अवैध शस्त्रांशी संबंधित एकूण ८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या काळात पोलिसांनी ९६ अवैध पिस्तुले आणि १३६ काडतुसे जप्त केली असून १६१ आरोपींना अटक करून कारागृहात पाठवले आहे. या आकडेवारीवरून अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांनी सातत्याने मोहीम राबविल्याचे दिसून येते. गुन्हेगार शस्त्रांच्या आधारे आपले बेकायदेशीर उद्योग वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्क आणि प्रभावी कारवाईमुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news