MHT CET PCM Result 2026: एमएचटी-सीईटी पीसीएम निकाल जाहीर; २६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

पुण्याच्या आर्यन कुंजीर, इबादूर रहमान बारलस्कर आणि नमिष कौशिकसह राज्यातील २४ विद्यार्थ्यांची चमक
MHT CET
MHT CETPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या तंत्रशिक्षणाअंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या संधीच्या पीसीएम सीईटीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये २६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले असून, २२ विद्यार्थी आणि ४ विद्यार्थिनी आहेत. यातील २४ विद्यार्थी राज्यातील असून, २ परराज्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MHT CET
Disability Hostel Reservation: दिव्यांग विद्यार्थ्यांचे आमरण अन्नत्याग आंदोलन; वसतिगृहांत स्वतंत्र ५ टक्के आरक्षणाची मागणी

पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक ११ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ रोजी आठ दिवसांमध्ये १६ सत्रांत घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

MHT CET
Pune Illegal Weapons: पुण्यात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची धडक मोहीम; १५ दिवसांत १७ जण अटकेत

या सीईटी परीक्षेत १६ सत्रांत मिळून ४ लाख ५४ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २ लाख ७३ हजार १३५ विद्यार्थी होते व १ लाख ८० हजार ९१६ विद्यार्थिनी होत्या; तर १८ तृतीयपंथीय होते. संबंधित सीईटी परीक्षा राज्यातील ४ लाख ४२ हजार २६१, तर राज्याबाहेरील ११ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी दिली. राज्यातील १८६ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

MHT CET
PMC Schools Partnership: महापालिकेच्या ५ शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’कडे; ९ ऐवजी ३ वर्षांचा प्रायोगिक करार

१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे विद्यार्थी

पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण २६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील २४ विद्यार्थ्यांमध्ये आर्यन शैलेंद्र कुंजीर (पुणे), आदर्श राज (मुंबई उपनगर), आर्यन अजित शर्मा (नागपूर), चैतन्य गणेश येरणे (चंद्रपूर), आशुतोषकुमार संजय चौबे (मुंबई), दर्शन गणेश चौधरी (चंद्रपूर), दर्शील राजन कुंटे (ठाणे), ईश्वरी सुरेश गागरे (अहिल्यानगर), इबादूर रहमान कामरुल बारलस्कर (पुणे), अनंत अशोक जाधव (धाराशिव), जान्हवी अस्ती (गोंदिया),

MHT CET
Pune Water Supply: पुण्यात सम-विषम पाणीपुरवठ्याचा पहिलाच दिवस; कमी दाबाच्या तक्रारींनी नागरिक त्रस्त

जान्हवी मिश्रा (चंद्रपूर), कनिष्क देवेंद्र वाघ (नागपूर), खानापुरे सार्थक (सोलापूर), ध्रुव धर्मराज खोसे (लातूर), ऐश्वर्य अतुल लाडे (नागपूर), नमिष कौशिक (पुणे), नमया धीरज अग्रवाल (गोंदिया), राजदीप विठ्ठल ठाकरे (यवतमाळ), रेयान कुमार (मुंबई ), ऋतुराज राजेश राजे (गोंदिया), शौर्य फुलबांधे (नागपूर), शौर्य पंकज सिंग (ठाणे), वेद रूपेश तळेले (ठाणे) या राज्यातील विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यामध्ये ४ विद्यार्थिनी आहेत. यामध्ये राज्याबाहेरील मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथील अगस्त्य पचौरी व पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील आर्यमन डोकानिया या दोन विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news