पुणे

पुणे : नारायणगाव येथे संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

येथे मीना नदीच्या बाजूला असलेल्या हरिहरेश्वर मंदिराजवळ संशयित स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. या मृत व्यक्तीच्या डोक्यावर जखम असल्याने त्याचा खून झाला असल्याची प्राथमिक शक्यता आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री उशिरा घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव संभाजी उर्फ गोविंद बबन गायकवाड (वय ४४, रा. येणेरे, ता. जुन्नर) असे आहे. संभाजी हा जागरण गोंधळाचे काम करीत होता. पोलिस ज्यावेळी घटनास्थळी गेले त्यावेळी संभाजी याचा मृतदेह शेतामध्ये एका चटईवर चादर टाकून झाकून ठेवलेला होता.

मृताच्या डोक्यावर दगडाने अथवा हत्याराने वार केला असल्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झालेला होता. संभाजी याचे येणेरे येथे राहत्या घरी पटत नव्हते, त्यामुळे तो बाहेरच राहत होता. नारायणगाव येथील हरिहरेश्वर मंदिरातही तो बऱ्याचदा रहात होता. हा भाग रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असल्याने याचा फायदा घेऊन त्याचा घातपात झाल्या असण्याची शक्यता नागरिकांमधून बोलून दाखवली जात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT