पुणे

Lok sabha Election 2024 Result : बारामतीमध्ये सुळेंची निर्णायक आघाडी; सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर काढले

Laxman Dhenge

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभेचे निर्णायक कल हाती येत आहे. साऱ्या देशाचे लक्ष लागून असणाऱ्या बारामतीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार (अजित पवार गट) सुनेत्रा पवार या सुरवातीपासून पिछाडीवर असलेल्या बघायला मिळाल्या. या दरम्यान सुप्रिया सुळे यांची निर्णायक आघाडी बघता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढण्यास सुरवात झाली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी सरळ सरळ लढत मानली जात होती. त्यात शरद पवार गट बाजी मारताना दिसून येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT