Lok sabha Election 2024 Result : धाराशिव : ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा विजय निश्चित कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Lok sabha Election 2024 Result : धाराशिव : ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा विजय निश्चित कार्यकर्त्यांकडून जल्लोष

धाराशिव : पुढारी वृत्तसेवा : अतिशय चुरशीने झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. सातव्या फेरीअखेर त्यांनी प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवार सौ अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर 70 हजार पेक्षा अधिक मताधिक्य घेतले आहे.

राजेनिंबाळकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने जिल्हाभरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. सातव्या फेरी अखेर उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजे निंबाळकर यांना एक लाख 73 हजार 460 इतकी मते मिळाली आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांना एक लाख 543 मध्ये मिळाली आहेत. या निकालाचा कल लक्षात घेऊन जिल्हा भरात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news