ब्रेकिंग | नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळलं, पायलट जखमी

ब्रेकिंग | नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळलं, पायलट जखमी

पुढारी ऑनलाइन-  नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी आहे.  सुखोई 30 हे विमान कोसळले आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात शिरसगाव परिसरातील एका  शेतात हे विमान कोसळले आहे. सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी विमानातील पायलट जखमी झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान विमान कोसळत असल्याचा अंदाज येताच पायलटने पॅराशुटचा वापर करुन उडी घेतल्याची माहिती आहे. प्रसंगावधान राखल्याने दोनही पायलट बचावले आहेत.  एचएएल येथील टीम सदर ठिकाणी जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news