पुणे

पाटीलवस्ती शाळेचे विद्यार्थी गिरवताहेत संगणकावर धडे

अमृता चौगुले

भवानीनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील पाटीलवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांच्या पुढाकाराने संगणकीकृत झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आता संगणकावर धडे गिरवू लागले आहेत. शाळा संगणीकृत झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाटीलवस्ती शाळेत गोरगरीब व मोलमजुरी करणार्‍या सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. येथील शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे लोकसहभागातून शाळेचा कायापालट झाला आहे. यासाठी राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक दिलीप काळे, गीतांजली लाड, अर्चना कुंभार, पल्लवी गवळी, राजश्री सुतार, शीतल लोंढे, मनीषा लोंढे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

शाळेचा सुंदर स्वच्छ व आल्हाददायक परिसर मुलांना मिळणारे दर्जेदार व गुणात्मक शिक्षण तसेच शाळेत राबवित असलेले विविध उपक्रमांमुळे आठ ते दहा किलोमीटर परिसरातून मुले या शाळेत शिक्षणासाठी येत आहेत. तसेच इंग्रजी आणि खासगी शाळेतील अनेक विद्यार्थीदेखील या शाळेत दाखल झाले आहेत. शिक्षकांच्या पुढाकारातून शाळेचा चेहरा-मोहरा बदलल्यामुळे पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. ग्रामस्थांबरोबरच विस्ताराधिकारी भिवाजी हागारे यांनी शाळेच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT