कमला एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांची गर्दी | पुढारी

कमला एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांची गर्दी

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीनिमित्त शनिवारी (दि.12) भाविकांनी अलोट गर्दी करीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. भाविकांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे आळंदी फुलून गेली होती. मोठ्या संख्येने वाहने शहरात दाखल झाल्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी झाली.

माउलींना नित्यपूजा विधी, पवमान अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ज्ञानेश्वर वीर यांनी ही माहिती दिली. अधिकमास व कमला एकादशीचे औचित्य साधत भाविकांनी इंद्रायणी घाटावर गर्दी केली होती. परंतु, इंद्रायणीच्या दूषित पाण्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

Back to top button