पुणे: एकेकाळी कुजबुजत बोलला जाणारा मासिक पाळीचा विषय आता सोशल मीडियावर निर्भयपणे मांडला जात आहे. फेसबुक, इन्स्टाग््रााम, यूट्यूब, पॉडकास्ट आणि हॅशटॅग मोहिमांच्या माध्यमातून तरुणी मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे, ‘पीरियड्स आर नॉर्मल’, ‘बेक द टॅबू’, ‘पीरियड पॉझिटिव्ह’ यांसारख्या मोहिमांमधून तरुणी मासिक पाळीबद्दल जनजागृती करीत आहेत. तसेच, ‘पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यात लपविण्यासारखे काही नाही,’ असा स्पष्ट संदेश दिला जात असून, या मोहिमांना प्रतिसादही मिळत आहे. गुरुवारी (दि. 28) असलेल्या मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने तरुणींशी संवाद साधला.
इन्स्टाग््रााम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि फेसबुक पोस्ट, व्हिडीओद्वारे अनेक तरुणी मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, स्वच्छता, आरोग्य आणि मेंस्ट्रुअल कपसारख्या पर्यायांबाबत माहिती शेअर करीत आहेत. काही तरुणींनी मासिक पाळीविषयी जनजागृती करणारे फेसबुक आणि इन्स्टाग््रााम पेज सुरू केले आहेत. तर, अनेक संस्था ऑनलाइन चर्चासत्रे, लाइव्ह सेशन आणि डिजिटल कॅम्पेनद्वारे किशोरवयीन मुलींमध्ये जागरूकता निर्माण करीत आहेत. डॉक्टर आणि स्त्रीरोगतज्ज्ञही सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य माहिती पोहचवत आहेत.
ग््रााफिक डिझायनर वृषाली वडनेरकर म्हणाल्या, मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तरुणींनी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. आज सोशल मीडियामुळे तरुणी निर्भयपणे अनुभव शेअर करीत आहेत. हा सकारात्मक बदल समाजासाठी महत्त्वाचा आहे. पाळीच्या दिवसांत मेंस्ट्रुअल कप वापरण्याविषयी महिला आणि तरुणींमध्ये मी जागृती करीत आहे. तसेच, ग््राामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये मासिक पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
स्नेहा म्हणाली, मी पाळीतल्या दिवसांचे अनुभव, त्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी आदी विषयांवर फेसबुक लेख लिहिले आणि त्याला तरुणींचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज अनेक संस्थाही सोशल मीडियावर जनजागृती मोहिमा राबवत आहेत. या मोहिमांमुळे ग््राामीण भागातील मुलींनाही योग्य माहिती मिळू लागली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून आम्ही मासिक पाळीबाबत जनजागृती करीत आहोत. आता सोशल मीडियामुळे तरुणी स्वतः पुढे येऊन बोलत आहेत. आम्हीही मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ‘प-पाळीचा जागर चॅलेंज’ उपक्रम राबवत आहोत. उपक्रमांतर्गत फेसबुक, इन्स्टाग््राामवर पोस्टर्सच्या माध्यमातून पाळीविषयीचा संकोच आणि गैरसमज कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच, तरुणींकडून त्यांच्या अनुभवांवर आधारित व्हिडीओ आणि काही संदेश लिहून पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद आहे.सचिन आशा सुभाष, समाजबंध संस्था