पुणे

पुणे : सिंहगड घाटरस्ता होणार रुंद

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अपघात रोखण्यासाठी सिंहगड घाट रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पीएमपी आणि पीडब्ल्यूडी अधिकार्‍यांची नुकतीच बैठक पार पडली. यात रुंदीकरणाच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे पीएमपीच्या बस आगामी काळात या घाट मार्गावरून सुरक्षित ये-जा करतील.

पीएमपीच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सिंहगडावरून खाली येताना शुक्रवारी एक ई-बस कठड्याला धडकली. मात्र, कठडा मजबूत असल्याने दुर्घटना घडली नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पीएमपी प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीकडून नुकतेच एक रुपया मानधनावर नेमण्यात आलेले निवृत्त आरटीओ अधिकारी मेडशीकर यांनी पीडब्ल्यूडी अधिकार्‍यांबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीत सिंहगड रस्त्यावर विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अपघाताच्या घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. प्रशिक्षित चालकच सिंहगडावर सेवा पुरवतील. तसेच, रस्ता रुंदीकरणाबाबत बांधकाम विभागासोबत बैठक झाली आहे. लवकरच रस्ता रुंदीकरण करण्यात येईल.

                     – लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

या उपाययोजना होणार…

  • प्रथम रस्त्याचे रुंदीकरण
  • घाट रस्त्याला मजबूत कठडे
  • वळणावर मोठे आरसे
  • बस चालकांना प्रशिक्षण
  • रस्त्याच्या बाजूला चर खोदणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT