Fish  Pudhari File Photo
पुणे

Pune Fish Rates: श्रावणात मांसाहाराला ब्रेक; मासळीच्या दरात ५० टक्के घट, चिकनही स्वस्त

मासळी, मटण आणि चिकनच्या मागणीत ७० टक्के घट; अंडीही शेकड्यामागे ३० ते ४० रुपयांनी स्वस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवरून मोठ्या प्रमाणात, तर पश्चिम किनारपट्टीवरून तुरळक मासळी बाजारात दाखल होत आहे. श्रावण महिन्यामुळे मासळी, मटण आणि चिकनच्या मागणीत तब्बल ७० टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी रोडावल्याने मासळीचे भावात पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे. बाजारात पक्ष्यांचा मुबलक पुरवठा होत आहे. मात्र, मागणीअभावी चिकनचे दर किलोमागे २० रुपयांनी घसरले आहेत.

गावरानसह इंग्लिश अंड्यांच्या दरातही शेकड्यामागे ३० ते ४० रुपयांची घट झाली असून, मटणाचे भाव मात्र स्थिर आहेत. श्रावण महिना संपेपर्यंत मासळी, मटण आणि चिकनला मागणी कमी राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गणेश पेठ येथील बाजारात रविवारी (दि. १६) खोल समुद्रातील मासळी ५ ते १० टन, खाडीतील सुमारे १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची १०० ते २०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ५ ते १० टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान : ९००-९००, भिला : ५००-६००, हलवा : ८००-९००, सुरमई ७००-९००, रावस : ८००-९००, घोळ : ८००-९००, करली : ३००-३५०, भिंग : ३००-४००, पाला : ८००-१२००, वाम : ६००-८००, ओले बोंबील : २००-३००.

कोळंबी : लहान : २५०-३५०, मोठी : ३५०-४५०, जम्बो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ६००-७००, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : ३००-४००, मांदेली : २००-२५०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३००-३५०, चिंबोर्‍या : ५००-६००. खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २५०-३००, तांबोशी : ४००-५००, पालू : २५०-३००, लेपा : ३००-५००, बांगडा : २००-३००, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १५०-२००, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १००-१५० तारली : २००.

नदीतील मासळी : रहू : १५०-१८०, कतला : १८०-२५०, मरळ : ३००-३५०, शिवडा : २००-२२०, खवली : १८०-२२०, आम्ळी : १००-१५०, खेकडे : २५०-३५०, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २१०, लेगपीस २६०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी : गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ५६०, डझन ८४, प्रतिनग ७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT