Pune FDA Action: पुण्यात FDAचा मोठा दणका! 16 हॉटेल्स, ऑनलाइन फूड विक्रेते आणि डेअरींचे परवाने निलंबित

अस्वच्छता व अन्न सुरक्षा नियमभंगावर कारवाई; पुण्यातील 8 आस्थापनांवर गाजली धडक मोहीम, शाळांजवळील जंक फूड विक्रेत्यांवर सोमवारपासून कारवाई
Hotel License Suspended
Hotel License SuspendedPudhari
Published on
Updated on

पुणे: अस्वच्छता आणि अन्‍न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, ऑनलाइन अन्‍नपदार्थ विक्रेते तसेच डेअरी आस्थापनांच्या तपासणीत अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील तब्बल १६ आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये पुणे शहरातील आठ आस्थापनांचा समावेश आहे. दरम्यान, शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्री करणाऱ्या दुकानांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचेही एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले.

Hotel License Suspended
Pune University New Colleges: पुणे विद्यापीठाच्या हद्दीत १३ नवीन महाविद्यालयांना सशर्त मंजुरी; परिसरातील कॉलेजांची होणार तपासणी

पुणे शहरातील हॉटेल चूल मटण (लोहगाव), सिंपली साऊथ (भोसरी), जेबीएम हॉस्पिटॅलिटी कॅन्टीन (वानवडी) आणि बर्गर किंग (ईस्ट स्ट्रीट, सोलापूर बाजार, कॅम्प) यांच्यावर कारवाई करण्यात आली. ऑनलाइन विक्री करणाऱ्यांमध्ये झेप्टो (लोहगाव), स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड (वारजे-कर्वेनगर) आणि ब्लिंक कॉमर्स (नेऱ्हे आणि टिंबर मार्केट, भवानी पेठ) यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील फॉर्च्युन एंटरप्रायझेस (हॉटेल सयाजी, लोणावळा), ओम साई राम मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स (रेटवडी, खेड) आणि धर्मनाथ दूध शीतकरण केंद्र (लोणी, आंबेगाव) यांच्यावर कारवाई झाली. सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज पिझ्झा, पिझ्झा हट आणि आर. के. मिल्क, तर सांगलीतील राजेश चायनीज आणि कोल्हापूरमधील हॉटेल पवन यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

Hotel License Suspended
Fake Government Websites: सावधान! सातबारा, इंडेक्स-२च्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे जाळे; बोगस संकेतस्थळांपासून सावध राहा

११ ते १४ ऑगस्टदरम्यान केलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली असल्याचे एफडीए कडून सांगण्यात आले. तसेच अन्नपदार्थ तयार करताना आणि विक्री करताना स्वच्छतेचे पालन करावे, असे एफडीए प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले असून, आगामी काळात तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे एफडीएने पत्रकाद्वारे नमूद केले.

Hotel License Suspended
Terminated Teachers Illegal Salary: सेवासमाप्त शिक्षकांना नियमबाह्य वेतनाचा आरोप; कोट्यवधींची वसुली करण्याची संस्थाध्यक्षांची मागणी

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अन्‍नपदार्थ तयार करताना अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Hotel License Suspended
Pune Police Service Medals: पुणे पोलिस दलातील २४ अधिकारी-अंमलदारांना सेवा पदक; आयुक्त अमितेश कुमार यांचाही गौरव

सोमवारपासून शाळा परिसरात कारवाई

शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकणाऱ्या दुकानांवर सोमवारपासून कारवाई केली जाणार आहे. जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीए प्रशासनाच्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news