Pune BSNL 700 Towers: पुण्यात BSNLचा नेटवर्क बूस्टर! ७०० टॉवर्सचे अपग्रेडेशन; नेटवर्क नसतानाही चालणार सॅटेलाईट मोबाईल

आपत्कालीन सेवांसाठी BSNLचा नवा सॅटेलाईट फोन; सैनिक, जहाज कंपन्या, गिर्यारोहक आणि दुर्गम भागातील यंत्रणांना मिळणार सुविधा
BSNL
BSNLPudhari
Published on
Updated on

पुणे: भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध योजना सुरू करत आहे. पुणे शहरात कनेक्‍टिव्हिटी चांगली देण्यासाठी ७०० टॉवर्स अपग्रेड करण्यात येणार आहेत. नेटवर्क नसतानाही खास आपत्कालीन सेवांसाठी तयार केलेला सॅटेलाईट मोबाईल नुकताच लाँच केला आहे.

BSNL
Pune FDA Action: पुण्यात FDAचा मोठा दणका! 16 हॉटेल्स, ऑनलाइन फूड विक्रेते आणि डेअरींचे परवाने निलंबित

पुणे बीएसएनएलचे महाव्यस्थापक (मोबाईल) अतुल वाखले यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७९ वर्षे पूर्ण होऊन पुढील वर्षी ८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशातील नागरिकांसाठी विविध योजना देण्यात येणार आहेत.

BSNL
Pune University New Colleges: पुणे विद्यापीठाच्या हद्दीत १३ नवीन महाविद्यालयांना सशर्त मंजुरी; परिसरातील कॉलेजांची होणार तपासणी

सुमारे १ लाख ३४ हजार १६६ रुपये किमतीचा सॅटेलाईट मोबाईल लाँच झाला आहे. मात्र, तो विशिष्ट व्यक्तींसाठी आहे. जसे देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिक, आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि कार्यालये यांच्यासाठी आहे.

BSNL
Fake Government Websites: सावधान! सातबारा, इंडेक्स-२च्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे जाळे; बोगस संकेतस्थळांपासून सावध राहा

फाईव्ह जी यंत्रणा करताहेत सक्षम

बीएसएनएल सध्या फोरजी यंत्रणा सक्षम करत आहे. यात टीसीएस, सी.डॉट. तेजस यासारख्या कंपनी साहाय्य करत आहेत. देशभरात सुमारे १ लाख टॉवरचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. यात पुणे शहरातील ७०० टॉवरचा समावेश आहे. ग्रामीण भागातील १०३ टॉवरचा त्यात समावेश आहे.

BSNL
Terminated Teachers Illegal Salary: सेवासमाप्त शिक्षकांना नियमबाह्य वेतनाचा आरोप; कोट्यवधींची वसुली करण्याची संस्थाध्यक्षांची मागणी

सॅटेलाईट मोबाईल नेमका कुणासाठी?

कुठलेही नेटवर्क नसताना चालणारा बीएसएनएलचा सॅटेलाईट मोबाईल यानिमित्ताने लाँच केला आहे. मात्र, हा मोबाईल सर्वसामान्यांसाठी नसून आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्था, गिर्यारोहण करणाऱ्या संस्था, समुद्रात काम करणारे कोळी बांधव, जहाज कंपन्या, दुर्गम भागात जाणाऱ्या पर्यटक यंत्रणा, इव्हेंट कंपनी, सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा, शासनाच्या विशेष आपत्कालीन यंत्रणा यांनाच तो दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news