पुणे

धक्कादायक! पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या; खडकवासला येथील प्रकार

Laxman Dhenge

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला येथील एका घरात पिण्याच्या पाण्यात आळ्या आढळल्याने नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाची आज सकाळी धांदल उडाली. माजी सरपंच सौरभ मते यांनी पाणीपुरवठा अधिकार्‍यांसह तातडीने पाहणी केली. त्यानंतर गंजलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. खडकवासला पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अक्षय गावित म्हणाले, 'मुख्य जलवाहिनीतून घरात जोडलेली जलवाहिनीला गंज येऊन ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे जलवाहिनीत शेजारच्या सांडपाणी चेंबरचे दूषित पाणी शिरले होते. त्यामुळे एकाच घरातील पाण्यात आळ्या सापडल्या. इतर ठिकाणी आळ्या सापडल्या नाहीत.'

जीर्ण वाहिनीची दुरुस्ती सुरू केली आहे. असे असले, तरी शेजारून गेली असल्याने दूषित पाणी आल्याचे प्रथमतः निदर्शनास येत खबरदारी म्हणून मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी (दि. 21) खडकवासला गावठाण पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत काळात जिल्हा परिषदेच्या वतीने पाणी योजना राबविण्यात आली होती. पावसाचे तसेच सांडपाणी पाणी साठणार्‍या ठिकाणी काही जलवाहिनी जीर्ण झाल्या आहेत. पस्तीस वर्षांपूर्वी गावात दूषित पाण्यामुळे काविळीची साथ पसरली होती. अशी गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने सुधारित पाणी
योजना राबवावी.

– सौरभ मते, माजी सरपंच, खडकवासला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT