पुणे

धक्कादायक ! अल्पवयीन मुलाला नग्न करत व्हिडीओ केले व्हायरल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डेक्कन परिसरातील झेड ब्रिज खालील नदीपात्रात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला कमरेच्या बेल्टने व लाकडी बांबूने बेदम मारहाण करून त्याला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत त्याचे कपडे काढून त्याला नग्न करून त्याची मोबाईलमध्ये व्हिडीओ क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी अन्सु शर्मा (वय 19, रा. मंडई, पुणे) व त्याच्या तीन साथीदारांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलाच्या 37 वर्षीय आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सु शर्मा व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी अन्सुला मारहाण करण्याकरिता तक्रारदार यांच्या मुलाने मुले पाठवल्याचा समज करून घेतला. त्या कारणावरून तक्रारदार यांच्या मुलाला कमरेच्या बेल्टने व लाकडी बांबूने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. त्यानंतर सदर मुलाचे कपडे काढून त्याला नग्न करून त्याची मोबाईलमध्ये व्हिडीओ क्लीप तयार करून ती इन्स्टाग्रामवर पाठवून व्हायरल केली. याबाबत पोलिसात तक्रार दिली, तर विविध ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली. याबाबत पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT