‘एआय’च्या साहाय्याने बनवला पिझ्झाचा बंगला! | पुढारी

‘एआय’च्या साहाय्याने बनवला पिझ्झाचा बंगला!

न्यूयॉर्क : ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ ही कल्पनाच लहानपणी किती मनोहर वाटत असे. त्याच धर्तीवर हल्ली ‘असावा सुंदर पिझ्झाचा बंगला’ अशी कल्पना बालचमू (आणि काही प्रौढही) करीत असतात. पाश्चात्य देशांमध्ये या जंकफूडचे बरेच सेवन केले जाते व त्यामुळे अनेकांच्या भावविश्वात पिझ्झा असा ठाण मांडून बसलेला आहे. आता ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने पिझ्झाचा वापर करून बंगला बनवला व त्यामधील सर्व फर्निचर, वस्तूही पिझ्झाच्याच असल्या तर ते द़ृश्य कसे दिसेल याची एक कल्पना करण्यात आली. ही कल्पनाचित्रे आता सोशल मीडियात लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आपल्यापैकी अनेकांना पिझ्झा खायला खूप आवडत असेल. चीज, पनीर व्हेजिटेबल असे विविध प्रकारचे पिझ्झा पाहताच तोंडाला पाणी सुटत असेल. पण विचार करा एखाद्यानं जर आपलं घरच पिझ्झापासून तयार केलं तर ते कसं दिसेल? होय, हाच विचार करून ‘एआय’च्या मदतीनं हा पिझ्झाचा बंगला तयार केला आहे.

या बंगल्यामध्ये पिझ्झापासून डिझाईन केलेलं बाथरूम, बेडरूम, किचन अशा विविध खोल्या आहेत. हा आलिशान बंगला पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल! काहींच्या तोंडाला पाणीही सुटेल यात शंका नाही. मात्र, ही केवळ एक कल्पना आहे आणि अमेरिकेतल्या लोकांसारखे नाश्ता, सकाळचे जेवण व रात्रीचे जेवण हे केवळ पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड्रिंकवर भागवून आरोग्याची नासाडी करण्याचे कारण नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे!

Back to top button