तिरुचिरापल्लीत ‘पद्मश्री’ उमेदवाराचा भाजी विकून सुरू आहे प्रचार | पुढारी

तिरुचिरापल्लीत ‘पद्मश्री’ उमेदवाराचा भाजी विकून सुरू आहे प्रचार

चेन्नई : तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली मतदारसंघातून ‘पद्मश्री’ने सन्मानित एस. दामोदरन अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांनी चक्क तिरुचिरापल्लीच्या भाजी मंडईत भाजी विक्रीचे दुकान लावत प्रचार सुरू केला आहे.

गेल्या 40 वर्षांपासून स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणार्‍या दामोदरन यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तिरुचिरापल्ली शहर व आसपासच्या ग्रामीण भागाचा कायापालट होऊन सर्वसामान्य माणसाला जगणे सुसह्य व्हावे हाच आपल्या उमेदवारीमागचा हेतू असल्याचे सांगत त्यांनी शहरातील गांधी मार्केटमधील भाजी मंडईत चक्क भाजी विक्रीचे दुकान लावले आहे. भाजी विकता विकता येणार्‍या मतदारांशी संवाद साधत ते प्रचार करीत आहेत. त्यांच्यामागे भाजी विक्रेत्यांची संघटनाही ठामपणे उभी असल्याचे ते सांगतात.

Back to top button