Police Pudhari
पुणे

Shikrapur Missing Girl: रात्रभर शोधमोहीमेनंतर ८ वर्षीय आरोही सुखरूप सापडली; शिक्रापूर पोलिसांचे मोठे यश

वडील रागावतील या भीतीने इमारतीच्या जिन्याखाली झोपली होती बालिका; पोलिस आणि आपदा मित्रांच्या प्रयत्नांना यश

पुढारी वृत्तसेवा

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरातून शाळेतून घरी आल्यानंतर दप्तरासह बेपत्ता झालेल्या ८ वर्षीय आरोही बैरागी हिचा शिक्रापूर पोलिस आणि आपदा मित्रांनी रात्रभर शोध घेत अखेर मंगळवारी (दि. २८) पहाटे सुखरूप शोध लावला. बालिका सुरक्षित मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

करंजेनगर येथे भाड्याने राहणारे देवेंद्र बैरागी यांची मुलगी आरोही सोमवारी (दि. २७) सायंकाळी ६ वाजता शाळेतून घरी आली होती. काही वेळांनंतर ती दप्तरासह घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र ती न सापडल्याने त्यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जीनेश कोळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक लहानू बांगर, पोलिस हवालदार अमोल नलगे, राकेश मळेकर, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, प्रफुल्ल सुतार, जयराज देवकर, नवनाथ केंद्रे, तसेच आपदा मित्र महेश साबळे, गणेश टिळेकर, शेरखान शेख, वैभव निकाळजे, श्रीकांत भाडळे, राहुल गायकवाड यांच्यासह अनेकांनी रात्रभर शोधमोहीम राबविली.

बालिकेचा शोध लागत नसल्याने वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, मंगळवारी पहाटे एका कॉलनीतील इमारतीच्या जिन्याखाली आरोही झोपलेल्या अवस्थेत आढळून आली.

पोलिसांनी चौकशी केली असता, वडील रागावतील या भीतीने आपण तेथे जाऊन झोपल्याचे तिने सांगितले. बालिका सुखरूप सापडल्याने पोलिस, आपदा मित्र आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शोधमोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT