महर्षिनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदिरानगर परिसरात ड्रेनेज वहिनी तुंबल्याने परिसरातील नागरिकांच्या घरांत सांडपाणी शिरले. या पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या उद्भवत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. इंदिरानगर वसाहतीत (प्रभाग 28) ड्रेजेन लाईन तुंबण्याची समस्या नित्याची आहे.
मागील तीन महिन्यांपासून या समस्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेकडून या वाहिनीची तात्पुरती दुरुस्ती केली जात आहे. त्यानंतर काही दिवसांनी ही समस्या पुन्हा उद्भवत आहे. प्रशासन व माजी नगरसेवकांनी यापूर्वी योग्यरीत्या कामे केली असती, तर आज ही समस्या निर्माण झाली नसती, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिका अधिकारी व ठेकेदारांची मिलीभगत असल्याने परिसरातील विकासकामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप स्थानिक महिला सुलताना शेख, झीनत शेख, आशिया तांबोळी यांनी केला आहे. या समस्येबद्दल बिलाल मशीद परिसरातील 72 महिलांनी महापालिकेकडे तक्रार अर्ज केला आहे.
महापालिकेकडून या वाहिनीची तात्पुरती दुरुस्ती केली जात असल्यामुळे ही समस्या काही दिवसांनंतर मजैसे थेफ होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही समस्या कायमस्वरूपी न सोडविल्यास आयुक्तांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार असल्याचे या महिलांनी सांगितले. याबाबत सहायक आयुक्तांशी संपर्क केला असता, ममाहिती घेऊन सांगतोफ, असे त्यांनी सांगितले.
इंदिरानगरमध्ये रविवारी पहाटेपासून ड्रेनेज लाईन तुंबल्याने आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागला. महापालिका प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील दुर्गंधी कमी करण्यासाठी आम्ही तुंबलेल्या चेंबरचे झाकण उघडून त्यातील सांडपाणी बादलीने काढून दुसर्या चेंबरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंबर मोकळा झाल्या नसल्याचे रहिवासी रिहाना शेख, अतीया तांबोळी यांनी सांगितले.
इंदिरानगर परिसरातील ड्रेनेजच्या चेंबरची वारंवार साफसफाई केली जात आहे. या वस्तीत रस्ता नसल्याने जेटिंग मशिन चेंबरपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे कामगारांच्या माध्यमातूनच चेंबरची साफसफाई करावी लागत आहे. नागरिकांनी ड्रेनजमध्ये कचरा न टाकल्यास ही समस्या उद्भवणार नाही.
– शुभम बाबर, कनिष्ठ अभियंता, महापालिका
हेही वाचा