पुणे

Sassoon Hospital : कारागृह प्रशासनाकडून परवानगीस विलंब; डॉक्टरांची खंत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात दाखल झालेल्या कैद्यांवरील उपचारांबाबत आम्हाला परस्पर कोणताही निर्णय घेता येत नाही. एखादी महत्त्वाची तपासणी करायची असल्यास कारागृह प्रशासनाची परवानगी लागते. बऱ्याचदा संपर्क साधूनही परवानगीस विलंब होत असल्याने उपचारांबाबत तातडीने निर्णय घेता येत नसल्याचे डॉक्टरांनी 'ऑफ द रेकॉर्ड' बोलताना सांगितले.

कैद्यांची 'एमआरआय'सारखी तपासणी करताना कारागृह प्रशासनाकडून परवानगी आणि पैसेही यावे लागतात. यासाठी ससूनकडून कारागृहाशी लेखी पत्रव्यवहार केला जातो. कारागृहाकडून वेळेत परवानगी मिळाल्याशिवाय कैद्यांबाबत कोणताही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे कैद्यांचा ससूनमधील मुक्काम वाढत असल्याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले.

बरेचदा कैद्यांमध्ये एकाच वेळी नानाविध आजारांचे निदान झालेले असते. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेताना संवेदनशीलतेने विचार करावा लागतो. 'वरून' याबाबत बरेचदा प्रेशरही आणले जाते. त्यामुळे 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT