पुणे

khed : सलग २० वर्षे सरपंचपद भुषवणारे सरपंच दत्तात्रय रौंधळ यांचे निधन

backup backup

खेड (khed) तालुक्यातील रौंधळवाडी ग्रामपंचायतीवर सलग २० वर्षे सरपंच म्हणून अबाधित सत्ता गाजविणारे रौंधळवाडी (ता. खेड जि.पुणे) (khed) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच दत्तात्रय विठ्ठल रौंधळ (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.१५) निधन झाले. दत्ता बिल्डर या टोपण नावाने ते खेडच्या पश्चिम भागात प्रसिद्ध होते.

रौंधळवाडी हे गाव खेडच्या भामा आसखेड धरणामुळे पुनर्वसित झालेले गाव आहे. याआधी पाईट-रौंधळवाडी संयुक्त ग्रामपंचायत होती.
पाईट ग्रामपंचायतमधून रौंधळवाडी गाव विभक्त झाल्यानंतर रौंधळवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली.

रौंधळवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. सरपंचपदाच्या माध्यमातून रौंधळवाडी या पुनर्वसित गावठाणात नागरी सुविधा निर्माण व गावात अनेक विकासकामे केली. पाच वर्ष पती, त्यानंतर पत्नी असे आलटून पालटून सलग २० वर्ष दत्तात्रय रौंधळ व त्यांच्या पत्नी अनिता रौंधळ यांची ग्रामपंचायतीवर अबाधित सत्ता गाजवली. रौंधाळ हे पाईट विकास सोसायटीचे विद्यमान संचालक असून, पाईट नवखंडेनाथ महाराज व सप्ताह समितीचे खजिनदार तसेच रौंधळवाडी येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे खजिनदार व गावकारभारी होते.

पाईट व रौंधळवाडी या दोन गावांच्या सर्वच सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या मागे रौंधळवाडीच्या माजी सरपंच अनिता दत्तात्रय रौंधळ, तीन मुली, एक मुलगा, एक भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रौंधळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT