Rohit Pawar pudhari photo
पुणे

Rohit Pawar: आमच्या मनात शंका... १० तारखेला विमान अपघाताबाबत अन् १२ ला विलिनीकरणाबात रोहित पवार मोठा गौप्यस्फोट करणार,

रोहित पवार हे १० फेब्रुवारी रोजी प्रेझेंटेशन करून अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. रात्रीच्या 'त्या' बैठकीबाबतही केला खुलासा

Anirudha Sankpal

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash And Wish: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार आणि स्वर्गीय अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आज जिल्हा परिषदेसाठी मतदान केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना पवार कुटुंबीयांचे एकत्र येणे, राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडी, अजित पवार विमान अपघाताबाबतच्या शंका आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींबाबत १० आणि १२ फेब्रुवारी रोजी अनेक गोष्टी लोकांसमोर ठेवणार असल्याचं सांगितलं.

कुटुंब म्हणून सर्वजण एकत्र

रोहित पवार यांनी पवार कुटुंबीय एकत्र येत असल्याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, 'सर्व पवार कुटुंबीय एकत्र मतदानाला आले होते. याबाबत विचारले असता रोहित पवार यांनी दादांची जी इच्छा होती. कुटुंब म्हणून स्वरच जण एकत्र आले पाहेजित. त्याबाबत दादांकडून देखील प्रयत्न केला जात होता.'

परिवार एकत्र असला पाहिजे, दादांची इच्छा

'सुप्रिया ताई पवार साहेब अम्ही सर्वजण असाच काहीसा प्रयत्न करत होतो. या दुःखाच्या प्रसंगी परिवार १३ दिवस एकत्रित आहे. अजित पवार यांना देखील परिवार म्हणून आपण एकत्रित असलं पाहिजे असं वाटत होतं. आज न ठरवता सर्वजण एकत्र आले. त्यांनी काटेवाडीला मतदान केलं. कुटुंब एकत्र आलेलं आपण पाहतोय.'

त्या बैठकीबाबत खुलासा

रात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तुम्ही पवार साहेब आणि पार्थ पवार एकत्र दिसत आहात. पवार साहेबांनी काय मार्गदर्शन केलं असं विचारताच रोहित पवार यांनी 'काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं. काही गोष्टी आपल्याला येत्या काळात कराव्या लागणार आहेत. त्या राजकीय नाहीत. दादांच्या स्मरणार्थ काय केलं पाहिजे ते कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे याबाबत ती चर्चा झाली असं सांगितलं.'

10 तारखेला प्रेझेंटेशन

सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या युटर्नबाबत विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, 'तो त्यांचा विषय आहे मात्र विमान अपघाताबाबत मी १० तारखेला पत्रकार परिषद किंवा प्रेझेंटेशन करून आमचे मुद्दे मांडणार आहे. आमच्या मनातल्या शंका मी त्यामाध्यमातून जनतेसमोर ठेवणार आहे. ही पत्राकर परिषद किंवा प्रेझेंटेशन मुंबईत होईल. तसंच १२ तारखेला मी विलिनीकरणाबाबत काय घडलं आणि दादांची इच्छा काय होती हे मी मुंबईतूनच लोकांसमोर आणणार आहे.

१२ तारखीच का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती. ती काय होती ती कशी होती हे मी १२ तारखेलाच पत्रकार परिषदेत सांगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT