Rohit Pawar On NCP Leadership: कुणी कितीही प्रयत्न केले तरी काकीच राष्ट्रवादीच्या प्रमुख... रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar Sunetra Pawar
Rohit Pawar Sunetra Pawar pudhari photo
Published on
Updated on

Rohit Pawar On NCP Leadership: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबीयांची बैठक घेतली. या बैठकीचा मूळ मुद्दा हा अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाबाबतचा असली तरी या बैठकीत पुढील राजकीय निर्णय अन् भूमिकांबाबत देखील चर्चा झाली असण्याची शक्यता अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार आणि कुटुंबातील इतर मंडळी देखील उपस्थित होते.

Rohit Pawar Sunetra Pawar
Anjali Damania On Parth Pawar: पार्थ पवारला क्लीन चीट मिळूच शकत नाही.... 'तो' कागद दाखवत दमानियांचा थेट चौकशी समितीलाच इशारा

या दुःखाच्या वेळी...

दरम्यान, या बैठकीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हे पवार कुटुंबीयांकडेच रहावे अशा आशयाचा प्रश्न विचारला असता. रोहित पवार यांनी, 'तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्रीपद आणि त्या राष्ट्रवादीचे प्रमुख पद हे सुनेत्रा पवार काकींकडेच रहवे अशी आमची देखील इच्छा आहे. फक्त या गोष्टी या दुःखाच्यावेळी बोलता येत नाहीत इतकंच.'

Rohit Pawar Sunetra Pawar
MCA Election Controversy: एमसीए निवडणुकीत रोहित पवार अपात्र? वादग्रस्त मतदार यादीने उडवली भिंत

कोणती कितीही प्रयत्न केले तरी

रोहित पवार सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत ३० आमदारांच्या पाठिंब्याबाबत पुढे म्हणाले की, 'लोकप्रतिनिधी हे आमदार असतात. आमदार लोकांच्या आशीर्वादाने निवडून येत असतात. त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल. आणि ३० हा आकडा बहुमताचा आहे. त्यांचे सर्व पदाधिकारी देखील सुनेत्रा काकींचेच नाव पुढे केले आहे. त्यामुळं कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमदारांचे म्हणणे, परिवाराचे म्हणणे, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आणि लोकांचे म्हणणे कोणी डावलणार नाही.

Rohit Pawar Sunetra Pawar
NCP Merger Controversy: विलिनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री कुठेच नव्हते; भाष्य करण्याचा अधिकार नाही – शरद पवार

पवार यानंतर म्हणाले, 'आम्हाला देखील असं वाटतं की, काकीच त्या पक्षाच्या प्रमुख राहतील.' याचबरोबर रोहित पवार यांनी विमानात काय घडलं याबाबत मी ९ तारखेला सांगणार आहे असे सुचक विधान देखील केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news