पुणे

पुणे : गाडी ढकलत नेताना रस्त्यात गाठून काळेपडळ येथे जबरी चोरी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत निघालेल्या दोन तरूणांकडील सोनसाखळी आणि दोन मोबाईल असा 30 हजारांचा ऐवज जबरी चोरी करून नेल्याचा प्रकार हडपसर येथील काळेपडळ मधील फेलेसिया सोसायटी येथे 1 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कैलास अर्जुन कसबे (38, रा. प्रथमा हाऊसिंग सोसायटी, रामटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी फिर्यादी यांचा मुलगा अश्विन आणि त्याचा मित्र अंकुश पेट्रोल संपल्यानंतर दुचाकी ढकलत होते. त्यावेळी दुचाकीवर दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी अश्विनच्या गळ्यातील 5 ग्रॅमची सोनसाखळी तसेच दोघांकडील दोन मोबाईल जबरी चोरी करून नेले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT