पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयासह महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मधील निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी शुक्रवार (दि.1) सकाळी 8 वाजल्या पासून संपावर जाणार आहेत. याबाबतची माहिती बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची 'मार्ड' या संघटनेच्या वतीने देण्यात आली. केंद्रीय 'मार्ड' संघटनेनेच हा निर्णय घेतला आहे. त्यामूळे, राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयातील रुग्णसेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे.
या संपामध्ये सर्व निवासी डॉक्टर्स विविध सेवा बंद ठेवणार आहेत. यामध्ये रुग्णालयातील सर्व ओपीडी (बाह्य रुग्ण सेवा), सर्व नियोजित शस्त्रक्रिया, नियोजित प्रक्रिया, स्थिर रुग्ण कक्षातील कार्य, स्थिर रुग्णांच्या तपासण्यासबंधित कार्य तसेच सर्व लसीकरण कार्यक्रम बंद राहील. या संपामध्ये निवासी डॉक्टर सर्व रुग्णालयातील विविध सेवा सुरु ठेवतील. यामध्ये अपघात विभाग (कॅज्यूअल्टी), सर्व अतिदक्षता विभाग, कोविड आयसीयु (कोविड व सर्वसाधारण), सर्व तात्काळ करवायच्या, जीवन-आवश्यक शस्त्रक्रिया व प्रक्रिया, सर्व जीवन-आवश्यक संबंधित विविध तपासण्या सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती 'बीजे' च्या मार्ड चे सचिव डॉ. ज्ञानेश्वर जामकर यांनी दिली.
दरम्यान, ज्या महाविद्यालयातील जिल्ह्यांत पूर-सदृश्य परस्थिती आहे तिथे सर्व आवश्यक तात्काळ सेवा, आपत्ती-निवारण आवश्यक सेवा सुरु राहतील.
या आहेत मागण्या