वडगाव शेरी: गणेश नगरसमोरील राजमाता जिजाऊ उद्यानात शनिवारी (दि. 6) एका युवकाचा खून झाला आहे. यामुळे उद्यानाची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या उद्यानामध्ये दररोज मुलांची टोळकी, वेगवेगळी ग््रुाप गोंधळ घालत असतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा रामभरोसेच आहे.
वडगाव शेरीतील गणेशनगर समोर राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या परिसरामध्ये एकमेव मोठे उद्यान आहे. उद्यानामध्ये चांगलीच झाडी आहेत. मुलांसाठी खेळणे तसेच व्यायामाची साहित्य आहेत. मात्र काही ठिकाणी अंधार आहे, तिथे सायंकाळी जोडपी प्रेमविलाप करताना दिसतात. त्यातूनच शनिवारी खूनाचा प्रकार घडला.
याकडे लक्ष देण्याची गरज!
उद्यानामध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे टवाळकी करणाऱ्या टोळक्याना रोखणारी कोणतीही यंत्रणा नाही.
पोलिसांची ग््रास्त उद्यानात कमी प्रमाणात असते. त्यामुळे रोडरोमिओ आणि गावगुंडांचा उद्यानात मोठा वावर आहे.
रस्त्यावरील पार्किंग ठरतेय वादास कारण
या उद्यानासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनासाठी पार्किंग करण्यासाठी जागा राखीव ठेवली आहे. पण, अजून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर, दुकान आणि नागरिकांच्या घरासमोर वाहने लावतात. उदयानात येणारे नागरिक आणि दुकानदारांचा दररोज वाद होतो. वडगाव शेरी जुना मुंढवा रस्ता हा उद्यानासमोर अरुंद आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लागल्याने. सकाळी आणि संध्याकाळी उद्यानासमोर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे गणेशनगर आणि सुंदराबाई शाळे समोरील चौकात कोंडी होते.
उद्यानामध्ये मुलांची अनेक टोळकी वावरत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या महिला-मुलींवर त्यांची शेरेबाजी सुरू असते. उद्यानात प्रकाश नसलेल्या ठिकाणी अनेक जोडपी आढळून येतात. यामुळे संध्याकाळी सातनंतर ट्रॅकवर चालताना भीती वाटते. या उद्यानामध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची गरज आहे. पोलिसांनी उद्यानामध्ये गस्त वाढवण्याची गरज आहे.एक स्थानिक महिला