खेड : राजगुरूनगर , (ता. खेड) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळजनक घटना घडली आहे.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह त्यांच्या ७ साथीदारांनी दोन तरुणांना “मतदारांना पैशाची बॅग वाटताना पळून का गेला?” अशा संशयातून बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
शहराचे माजी नगराध्यक्ष असलेले शिवाजी मांदळे हे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ६ मधून नगरसेवक आणि शहरातून थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.फिर्यादी साई विलास पिंगळे यांनी तक्रार दिली आहे.
संबंधित युवक पैसे वाटप करताना आढळुन आले. कार्यकर्त्यांनी पकडायचा प्रयत्न केला असता ते पळुन चालले होते. कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली त्यांना आवरण्याचा मी प्रयत्न केला.त्यांनी पोलिसात तक्रार दिली, त्यात रात्री साडेअकरा वाजता प्लॉट पाहायला आल्याचे म्हटले आहे. पोलीस सखोल चौकशी करून योग्य न्याय देतील.शिवाजी मांदळे, माजी नगराध्यक्ष, राजगुरुनगर