पुणे

समाजकल्याण अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अधिकाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने लाच देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कार्यालयातच पैसे उधळल्याने त्या अधिकाऱ्याच्या केबीनमध्येच पैशांचा पाऊस पडल्याचे चित्र दिसत होते. झाल्या प्रकाराने जिल्हा परिषदेत मात्र खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्याकडे असलेल्या दलित वस्ती संदर्भातील काम मंजूर करून घेण्यासाठी शिरूर येथील एक गृहस्थ आले होते. त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला.
हे पैसे नाकारत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी पैसे फेकले.

जिल्हा परिषदेच्या वर्तुळात या प्रकरणाची सकाळ एकच चर्चा सुरू आहे. यासंदर्भात कोरंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दलित वस्ती चे काम मंजूर करून घेण्यासाठी एक व्यक्ती सकाळी माझ्या कार्यालयमध्ये आली होती. त्यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला. आपण तुझे काम करून देतो, तुम्ही जा, असा सल्ला मी त्यांना दिला. मात्र त्या व्यक्तीने माझ्या कार्यालयात नोटा फेकल्या.

नोटा घेऊन आलेल्या व्यक्तीवर आता काय कारवाई होणार याकडे संपूर्ण प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT