पुणे

पुणे : रेल्वे पार्किंग ठेकेदाराला 60 हजारांचा केला दंड

अमृता चौगुले

पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील 'पार्किंग' क्षमतेपेक्षा भरले असतानाही रेल्वेच्या पार्किंग ठेकेदाराने प्रमाणापेक्षा जादा गाड्या लावून प्रवाशांना
मनस्ताप दिला. यासंदर्भात दै. पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत, रेल्वे पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे
यांनी संबंधित ठेकेदाराला याप्रकरणी 60 हजार रुपयांचा दंड केला आणि प्रवासी, वाहनचालकांची दिलगिरी व्यक्त केली.

पुण्यातून दुसर्‍या शहरात कामानिमित्त जाणारे रेल्वे प्रवासी आणि प्रवाशांना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय पुणे रेल्वे स्थानकातील वाहन पार्किंगमध्ये आपली वाहने पार्क करतात. रविवारी (दि. 11) प्रवासी आपली वाहने पार्किंग करून प्लॅटफॉर्मवर गेले. मात्र, वाहने क्षमतेपेक्षा जास्त आल्याने ठेकेदाराने बेशिस्तपणे वाहनांचे पार्किंग केले, त्यामुळे अनेक प्रवाशांची वाहने अडकली आणि त्यांना मनस्ताप झाला.

यासंदर्भात दै.फपुढारीफमध्ये मसांगा…आमच्या गाड्या कशा काढायच्या?फ असे वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दुबे यांनी दखल घेत, चौकशीअंती ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली.(पान 1 वरून) प्रवाशांची वाहने अडकली आणि त्यांना मनस्ताप झाला. यासंदर्भात दै.फपुढारीफमध्ये मसांगा…आमच्या गाड्या कशा काढायच्या?फ असे वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दुबे यांनी दखल घेत, चौकशीअंती ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली.

बेशिस्तपणे प्रवाशांच्या वाहनांचे पार्किंग करून घेणार्‍या ठेकेदारावर आम्ही दंडात्मक कारवाई केली आहे. त्याला 60 हजारांचा दंड करण्यात आला असून, यापुढे अशा चुका पुन्हा होऊ नयेत, याबाबत सूचित केले आहे.

– इंदू दुबे,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT