पुणे: राज्याचे यंदाच्या 2025-26 च्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी 11 लाख 23 हजार 272 क्विंटलइतक्या बियाण्यांची आवश्यकता आहे. तर प्रत्यक्षात 14 लाख 68 हजार 670 क्विंटलइतक्या बियाण्यांची उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. गरजेपेक्षा रब्बी हंगामात सुमारे 3.45 लाख क्विंटलइतक्या जादा बियाण्यांची उपलब्धता असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) अशोक किरनळ्ळी यांनी दिली. (Latest Pune News)
रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र हे सुमारे 54 लाख हेक्टरइतके आहे. त्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे 63 लाख 69 हजार हेक्टरवर यंदा रब्बी हंगामातील पेरा होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण खरीपात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे पाणी उपलब्धतेचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे सुमारे 9 ते 10 लाख हेक्टरने रब्बी पिकांचे क्षेत्र वाढेल, अशी स्थिती आहे.
पिकांची क्षेत्रवाढ विचारात घेऊनच राज्य सरकारचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), केंद्र सरकारचे राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) आणि खाजगी बियाणे कंपन्यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. रब्बी हंगामात संभाव्य बियाण्यांची मागणी अपेक्षित धरुन नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार महाबीजकडून 3 लाख 92 हजार 513 क्विंटल, एनएससीकडून 35 हजार 19 क्विंटल तर खाजगी बियाणे कंपन्यांकडून 10 लाख 41 हजार 58 क्विंटलइतक्या बियाण्यांचा पुरवठा निश्चित करण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थितीत रब्बी हंगामातील पेरण्यांनी वेग घेण्यास सुरुवात केली आहे. तर कंपन्यांकडून आत्तापर्यंत 3 लाख 88 हजार 143 क्विंटलइतका बियाण्यांचा पुरवठाही झालेला आहे. उर्वरित पुरवठ्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.
गहू, मका, हरभरा क्षेत्र वाढण्याचा अंदाज
पाणी उपलब्धता अधिक असल्याने ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राइतकी निश्चित होईल. मात्र, यंदा गहू आणि मक्याची पेरणी सरासरी ओलांडण्याची अपेक्षा आहे. तसेच भात पिकाची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून हरभऱ्याचाही पेरा वाढण्याचा अंदाज अपेक्षित असल्याचे ते म्ह
रब्बी पिकांच्या पेरण्यांखालील संभाव्य क्षेत्र, बियाण्यांची गरज व पुरवठ्याचे नियोजन - (क्षेत्र हेक्टरमध्ये), (बियाणे क्विंटलमध्ये)
क्र. रब्बी पिके अपेक्षित क्षेत्र बियाणे गरज बियाणे उपलब्धता
1 रब्बी ज्वारी 15,50,000 38,750 55,909 2 गहू 12,50,000 4,62,500 7,31,985
3 मका 4,75,000 71,250 81,140
4 हरभरा 28,50,000 5,47,200 5,96,122
5 करडई 50,000 2,250 1,966
6 इतर पिके 1,94,000 1,322 1,548
एकूण 63,69,000 11,23,272 14,68,670