

Maharashtra Open Canal Closure
पुणे: राज्यात पाटबंधारे प्रकल्पातून शेतीला पाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेले कालवे पूर्णपणे उघडे आहेत. (प्रवाही पध्दतीचे कालवे) त्यामुळे पाणी गळती वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन उघडे असणारे कालवे लवकरच बंदिस्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी गळती तर थांबणार आहे. या बंदिस्त कालवे कसे करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्यात मोठे, मध्यम, लहान असे मिळून तीन हजारांहून अधिक धरणे, तलाव आहेत. मात्र, धरणे बांधल्यानंतर त्या धरणामधून शेतीच्या सिंचनासाठी त्याचबरोबर नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असलेले पाणी उघडया (प्रवाही पध्दतीचा कालवा ) कालव्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, ही वितरण प्रणाली तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही. म्हणजेच या उघड्या कालव्यांची दुरूस्ती वेळेवर होत नाही .त्यामुळे या कालव्यामधून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच काही नागरिक जलसंपदा विभागातील संधान साधून या कालव्यातून पाण्याची चोरी करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबरोबरच बाष्पीभवन, पाणी चोरीचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याबाबत विविध लोकप्रतिनिधी तसेच महामंडळाकडून उघड्या प्रवाही कलव्याचे रूपांतर बंद कालव्यामध्ये करावे, अशी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होत होते.
ही बाब लक्षात घेऊन बंदिस्त कालव्याचे धोरण निश्चित व अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठित केली आहे. या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणाले आहेत. इतर सदस्य असे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे कार्यकारी संचालक (सदस्य), गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता, छत्रपती संभाजीनगर (सदस्य), मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर (सदस्य), अधीक्षक अभियंता कालवे संकल्पचित्र मंडळ, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक (सदस्य), अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे (सदस्य सचिव)