पुणे

.. लाव रे ते होर्डिंग ! ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत डिजिटल फलकामुळे विद्रूपीकरण

Laxman Dhenge

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग्ज, डिजिटल फलकांचा सुळसुळाट झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. गावागावांतील दादांकडून दादागिरी करत होर्डिंग लावण्याचे काम जोरदार सुरू आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग पाहायला मिळत आहेत. पुणे- सोलापूर रस्ता, पुणे- सातारा रस्ता, पुणे- नाशिक रस्त्यावर अनेक ठिकाणी वाढदिवस, राजकीय नेत्यांचे फलक लागले आहेत.

अनेक भावी नेत्यांचे फलक सध्या ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. होर्डिग्ज, फलकांनी या ठिकाणी विद्रुपीकरण झाले आहे. परवाना न काढता लावलेले होर्डिग्ज, फलकांमुळे उत्पन्नावरही पाणी फिरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक ठिकाणी भिंतीला भलीमोठी होर्डिग्ज लटकलेली दिसून येत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे आधीच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ती रोखण्यासाठी चांगले रस्ते असणे आवश्यक आहे. मात्र, अरुंद रस्त्याच्या कडेलाच होर्डिग्ज लावल्यामुळे प्रवास करताना नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना सुहास लोणकर म्हणाले, पुरंदरच्या हद्दीत रस्त्याच्या कडेने अनेक नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने होर्डिंग लावले आहेत. यावर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. शहराच्या भोवताली मोठ्या प्रमाणात हॉटेलची उभारणी होत आहे. ही हॉटेल्स कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सरसकट पद्धतीने होर्डिंग लावत असल्याचेही वास्तव समोर आले आहे.

कमी खर्चात जाहिरातीचा फंडा म्हणून होर्डिग्ज, डिजिटल फलकांच्या माध्यमातून जाहिरातबाजी केली जाते. मात्र, अशा होर्डिग्ज, डिजिटल फलकांच्या सुळसुळाटामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे, ही वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. पीएमआरडीएने होर्डिग्ज, फलकांच्या संख्येवर मर्यादा आणणे आवश्यक आहे. वर्दळीच्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी खासगी जागेत वजनदार लोखंडी सांगाड्याची भलीमोठी होर्डिग्ज उभारलेली आहेत, काही ठिकाणी ही होर्डिग्ज भिंतीला लटकलेली दिसून येत आहेत. पिंपरी- चिंचवडजवळील किवळेमध्ये काही महिन्यांपूर्वी वादळी वार्‍याने होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

– विठ्ठल पोमण, नागरिक.

होडिर्र्ग्ज, डिजिटल फलकांनी शहराभोवतालचे विद्रुपीकरण वाढत आहे. ते रोखण्यासाठी प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीच्या होर्डिंगमुळे अनेकवेळा लहान- मोठे अपघात घडलेले आहेत. त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. इमारतीच्या टेरेसवर उभारलेल्या अनधिकृत होर्डिग्ज, डिजिटल फलक, फ्लेक्सविरोधात कारवाईसाठी शासनाकडे पुरेसे मनुष्यकाळ दिसत नाही, ही होर्डिग्ज कोसळून अपघात घडू नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरचा दाखला घेऊनच होर्डिग्ज उभारण्यास परवानगी द्यावी, असा नियम आहे. वारा, वादळ, पाऊस व इतर कारणाने होर्डिग पडले किंवा काही घटना घडल्यास व कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी राहील, असे हमीपत्रही संबंधितांकडून घेतले जावे.

– अ‍ॅड. रोहित जगताप

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT