Temperature Rise Pudhari
पुणे

Maharashtra Rising Temperature: फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा; पुरंदर तालुक्यात तापमान वाढीचा आरोग्यावर परिणाम

दिवसा चटके, रात्री गारवा; लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये ताप-खोकल्याचे प्रमाण वाढले

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: यावर्षी फेबुवारी महिन्यांच्या सुरुवातीलाच उन्हाची तीवता जाणवू लागली. सध्या दिवसभर उन्हाचे चटके; तर रात्रभर गारवा असे वातावरण आहे. यामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

मागील काही दिवसांपासून सर्वत्र दिवसांचा पारा वाढला आहे. सरासरीपेक्षा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणखी तीव होणार आहेत. सध्या दिवसा चटके लागत असले तरीही रात्रीचा गारवा मात्र कायम आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे डॉ. किरण बालगुडे यांनी सांगितले. या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांसह वृद्धांमध्ये ताप, खोकला, सर्दीचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. सतीश खलाटे यांनी सांगितले.

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुरंदर तालुक्यात आकाश स्वच्छ असून वातावरण कोरडे आहे. सकाळपासून सूर्याचे तापमान अधिक होत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणीला वेग आला असून, शेतकरी व मजूर दिवसभर उन्हात काम करीत आहे.

एप्रिल-मेमध्ये कडक उन्हाळा

यावर्षी उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल, मे महिन्यांत सूर्य आग ओकणार असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उन्हासोबतच नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे.

आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कडक ऊन पडत आहे. अचानक ऊन तापल्याने व रात्रीचा गारवा कायम राहिल्याने लहान मुले,व योवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे आजारी व्यक्तींनी अंगावर दुखणे काढू नये, स्वतः गोळ्या-औषधी न घेता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करून घ्यावे.
डॉ. अजित रजपूत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT