Badlapur Municipal Budget Pudhari
पुणे

Pune Jilha Parishad Budget 2026: पुणे जिल्हा परिषद अर्थसंकल्प; शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासावर भर

30 नावीन्यपूर्ण योजना जाहीर; मॉडेल स्कूल, एआय प्रशिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात ग््राामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडण्यात आला असून, यात शिक्षण विभागाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. एकूण 30 नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश असलेल्या या अर्थसंकल्पात महिला कल्याण आणि आरोग्य विभागासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी ‌‘मॉडेल स्कूल‌’ उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असून, जिल्ह्यातील 606 शाळांमध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्नित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ‌‘कौशल्य सेतू‌’ योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा सायन्स, चॅटबॉट आणि इमेज जनरेशन यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, जिल्ह्यात दोन ठिकाणी विज्ञान पार्क उभारण्याची योजना असून, प्रयोगातून विज्ञान शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. रोजगाराभिमुख शिक्षणासाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून, उद्योगांच्या सहकार्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. इंग््राजी भाषा कौशल्यवृद्धीसाठी स्वतंत्र कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इस्रो, नासा, तसेच युरोपियन स्पेस सेंटरमध्ये शैक्षणिक सहली आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.

विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम, बाल संसद, ‌‘समाजमंदिर ते ज्ञानमंदिर‌’, तसेच बाल साहित्य संमेलन यांसारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय अनुभव कार्यक्रम राबवून निवडक शिक्षकांना परदेशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्याची संधी देण्यात येणार आहे. आरोग्य विभागासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‌‘मॉडेल पीएचसी‌’ उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. 9 ते 14 वयोगटांतील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी स्वतंत्र ‌‘पिंक रूम‌’ तयार करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी योग व ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

पर्यावरणपूरक विकासासाठी सोलार पार्क, सामुदायिक बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, तसेच ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. गावांच्या पातळीवर सौरऊर्जेतून वीज निर्मतीि करून शाश्वत ऊर्जा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. महिला, दिव्यांग आणि बचत गटांसाठी विविध योजना अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या आहेत. दिव्यांगांना व्यवसायासाठी आर्थकि साहाय्य, एकल महिलांसाठी स्वावलंबन योजना, बचत गटांच्या उत्पादनांसाठी फिरते विक्री केंद्र, ‌‘सावित्री कॅफे‌’, तसेच दुबई येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागाची संधी देण्याचा प्रस्ताव आहे.

प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा डेटा सेंटर, अनुभव केंद्र, जिल्हा परिषद फेलोशिप, ग््राामीण इनोव्हेशन सेंटर अशा योजनांचा समावेश केला आहे. डिजिटल प्रणालीद्वारे कामकाज अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. समाजकल्याण, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पंचायत, पायाभूत सुविधा, कृषी व पशुसंवर्धन या विभागांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आली असून, वैयक्तिक लाभ योजनांद्वारे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पाद्वारे ग््राामीण भागातील शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षानिमित्त जिल्हा परिषद पुढील वर्षातील सर्व उपक्रम आणि प्रकल्प राबविताना सामाजिक न्याय, सर्वसमावेशक शिक्षण आणि वंचित घटकांचे सक्षमीकरण या महात्मा फुले यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन करण्यात येणार आहे. ग््राामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, शेतकरी व मागास घटकांसाठी कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT