पुणे: पुणे जिल्हा परिषद हा अजित पवार यांचाच गड आहे आणि तो त्यांचाच राहील, असे स्पष्ट मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. गेल्या 30 वर्षांपासून पुणे जिल्हा परिषद ही अजित पवारांकडे राहिली आहे. या वेळेच्या निवडणुकीत अजित पवार आपली प्रतिष्ठा राखू शकतील का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते बोलत होते.
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती होस्टेलमध्ये रविवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर दत्तात्रय भरणे माध्यमांशी बोलत होते. भरणे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बैठका सुरू असून, प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांना बोलाविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार ’घड्याळ’ या एकाच चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय अजित पवार घेतील. ग््राामीण भागात दोन चिन्हे असतील, तर मतदारांमध्ये गोंधळ होतो. त्यामुळे कोणतीही आघाडी असली, तरी एकच चिन्ह असणे केव्हाही फायदेशीर ठरते.
महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षातील अनेक जणांनी पक्ष सोडला होता. त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणुकीत होईल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता भरणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग््रेासला कोणतीही गळती लागलेली नाही. कोणीही पक्ष सोडणार नसल्याने त्यांना रोखण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादीचे सच्चे कार्यकर्ते आपल्या जागेवर ठामपणे उभे राहणार आहेत. जिल्हा परिषदेचा एकही पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही, याचा मला शंभर टक्के विश्वास आहे. ग््राामीण भागातील जनतेला राष्ट्रवादी काँग््रेासचा विचार मुळापासून माहीत आहे. जालिंदर कामठे पुन्हा पक्षात आले आहेत, तर शरद बुट्टे पाटील हेही राष्ट्रवादीत येत आहेत. उलट राष्ट्रवादी काँग््रेासची ताकद वाढत आहे. ग््राामीण जनतेशी राष्ट्रवादीचे घट्ट नाते आहे.
प्रदीप गारटकर यांचा जिल्हा परिषदेशी कोणताही संबंध नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी पक्ष सोडला होता, असेही भरणे यांनी स्पष्ट केले. पुणे उपनगरातील राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे काही ताकदीचे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यांत पक्ष सोडून गेले. त्याचा फटका महापालिका निवडणुकीत पक्षाला बसला, या प्रश्नावर भरणे म्हणाले की, याबाबत अजित पवार यांनी आधीच खुलासा केला आहे. त्यांनी खुलासा केल्यानंतर मी अधिक बोलणे योग्य नाही. मात्र, शेवटी पराभव हा पराभवच असतो. तो स्वीकारायलाच हवा. पराभवातून काही गोष्टी शिकायच्या असतात आणि आमचे उमेदवार त्यातून नक्कीच शिकतील.
शेतकऱ्यांचा मलेशिया दौरा
यापूर्वी राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान तुटपुंजे होते. आता आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान दिले आहे. शेतकरी मलेशियात जाऊन नवीन तंत्रज्ञान शिकतील आणि त्याचा फायदा आपल्या देशातील शेतीला होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि भविष्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असे भरणे म्हणाले.
नाना पटोले यांच्या मताशी सहमत नाही
जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग््रेासनेते नाना पटोले यांनी केली होती. याबाबत बोलताना भरणे म्हणाले, पराभव हा पराभवच असतो आणि तो मान्य करावा लागतो. ईव्हीएमवर आरोप करणे चुकीचे आहे.