पुणे

पुणे : पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची २४ तासांतच आत्महत्या

अविनाश सुतार

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : साता जन्माच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात, ही गाठ सोडवण्याचा नियतीने प्रयत्न केला खरा ; पण 'थांब मी तुझ्या सोबतच येते', असे म्हणत पतीच्या निधनानंतर अवघ्या २४ तासांतच 'तिने'ही जगाचा निरोप घेतला. भिगवणमध्ये घडलेल्या पती-पत्नीच्या अनाहूत मृत्यूच्या घटनेने आज (शनिवार) भिगवणकर दिवसभर सुन्न झाले होते. पतीचा विरह सहन न झाल्याने साक्षी उर्फ पियुषा ज्ञानेश्वर बिबे या विवाहितेने शुक्रवारी (दि. १३) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिगवण येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेंद्र बिबे हा २७ वर्षीय युवक आपल्या वीटभट्टीला लागणाऱ्या मातीच्या ढिगार्‍यावर झोपला होता. रात्री साडेतीन च्या सुमारास माती घेऊन आलेल्या हायवा चालकाने हायवा मागे घेताना ज्ञानेश्वरला चिरडले. व अख्खा मातीचा टिपर अंगावर खाली केला होता. यामध्ये माऊलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, सहा महिन्यापूर्वी ज्ञानेश्वर याचा विवाह झालेली साक्षी ही मात्र पतीचा विरह सहन करु शकत नव्हती.

तू मला एकटीला का सोडून गेलास, मलाही न्यायचे होतेस, थांब मी येते, मलाही सोबत ने, असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश साक्षी करत होती. तर घरातील लोक तिची समजूत काढून तिला धीर देण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र आपल्या पतीचा विरह सहन होत नसल्याने तिने गुरुवारी (दि. १३) रात्री साडेनऊ च्या सुमारास घरातील अँगलला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने अवघे भिगवणकर सुन्न झाले आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT