Ambati Rayudu : रैना अनसोल्ड, जडेजा अनफॉल आता अंबातीची निवृत्ती; चेन्नई संघात काय घडतंय? | पुढारी

Ambati Rayudu : रैना अनसोल्ड, जडेजा अनफॉल आता अंबातीची निवृत्ती; चेन्नई संघात काय घडतंय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) हा असा संघ मानला जातो, जो खेळाडूंना कुटुंबाप्रमाणे वागवतो. त्यांना उत्तम सुविधा मिळतातच, पण वाईट काळातही त्यांना खूप आधार मिळतो. आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात मात्र अशा काही घटना घडल्या आहेत ज्या चेन्नई संघात यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. हंगामापूर्वी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कर्णधार बनवण्यात आले. मोसमाच्या मध्यात त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि आता अंबाती रायडूने (Ambati Rayudu) अचानक निवृत्ती जाहीर केली. मात्र, टीमचे सीईओंनी पुढाकार घेताच रायुडूने ट्विट काढून टाकले.

संघात दुसऱ्या स्थानावर असणारा रैना राहिला अनसोल्ड

तसं पाहिलं तर टीमचा माजी सदस्य सुरेश रैना (Suresh Raina) याच्या पासूनच सुरुवात झाली. त्याला धोनीनंतर (MS Dhoni) नंबर-२ आणि मिस्टर आयपीएल असं म्हटल जायचं. 2022 च्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने सुरेश रैनाला कायम ठेवले नाही. पण, संघ त्याला लिलावात विकत घेईल, असे मानले जात होते. परंतु, तसे झाले नाही. काही लोक म्हणायचे की रैनाला 2020 च्या सीझनमधून बाहेर पडण्याची शिक्षा झाली आहे. केवळ सीएसकेच नाही तर कोणत्याही संघाने सुरेश रैनावर बाजी मारली नाही. तो अनसोल्ड राहला आणि आता तो समालोचन करताना दिसत आहे. हा तोच सुरेश रैना आहे, ज्याच्या जोरावर चेन्नईने अनेक सामने जिंकले आहेत. (Ambati Rayudu)

रवींद्र जडेजाचे कर्णधारपद गेले आणि मग तो ही बाहेर पडला

आता रवींद्र जडेजाबद्दल बोलूया. जडेजाने कर्णधारपदाची धुरा सांभाळली, पण तो कधीच कर्णधार म्हणून दिसला नाही. संघाने पहिले 4 सामने गमावल्याने दबाव वाढला. तो स्वत: कामगिरी करू शकला नाही. थकल्यानंतर जडेजाने धोनीकडे कर्णधारपद परत केले. काही सामन्यांनंतर, तो जखमी झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र, या संपूर्ण प्रकरणापेक्षा जडेजा आणि संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजने एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा होती. (Ambati Rayudu)

दोन सामने आधी निवृत्ती का ? (Ambati Rayudu)

चेन्नईचा संघ आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, संघाचे अजून काही सामने बाकी आहेत. माजी कर्णधार रवींद्र जडेजा ‘दुखापती’मुळे आधीच संघ सोडून घरी परतला. मात्र, या घटनेमुळे त्यांचा व्यवस्थापनाशी वाद झाल्याच्या तर्काला चालना मिळाली. ते जडेजाबद्दल होते. जडेजाचे प्रकरण सुटत नव्हते तोच अंबाती रायडूने अचानक निवृत्ती जाहीर केली. त्याचा फॉर्म चांगला नाही यात शंका नाही, पण निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे का?.’ या वेळी सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन सामन्यांनंतरही तो जाहीर करू शकला असता. शिवाय रायडू असा खेळाडू आहे जो एखाद्या गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रीया देतो.

या आधी अंबाती रायडू याने विश्वचषक-2019 साठी संघात निवड न झाल्याने काही तासांत त्याने निवृत्ती जाहीर केली होती. इतकंच नाही तर त्याच्या थ्रीडी ट्विटनेही बरीच चर्चा घडवली होती. मात्र, नंतर त्याने निवृत्ती मागे घेतली. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत की, रायुडूला कोणी काही बोलले तर तो नक्कीच प्रतिक्रिया देईल. इथेही एकच प्रश्न पडतो की त्याच्यावर कोणी दबाव आणला आहे का ?

संघ व्यवस्थापनाला देखिल नव्हती कल्पना

बरं, संघ मालक आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्या निर्णयाची पूर्ण कल्पना नव्हती. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले, “मी स्पष्ट करू शकतो की अंबाती रायडू आयपीएलमधून निवृत्त होत नाही. होय, त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. कदाचित त्याने भावनिक अवस्थेत ट्विट केले असेल. त्याच्याशी बोललो त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे.”

नेमके रायुडूने काय ट्वीट केले

रायडूने ट्विट केले की, “हे माझे शेवटचे आयपीएल असेल हे जाहीर करताना आनंद होत आहे. या लीगमधील माझ्या १३ वर्षांच्या प्रवासात मला दोन महान संघांचा भाग बनण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला आहे. या अप्रतिम प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्जचे मनापासून आभार मानू इच्छितो.” मात्र त्याने तासाभरात ही पोस्ट हटवली. या वर्षी मोठ्या आयपीएल लिलावात चेन्नईच्या संघाने त्याच्यासाठी 6.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्याने या मोसमात 124 च्या स्ट्राईक रेटने 271 धावा केल्या आहेत.

Back to top button