

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या बीकेसी मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज विराट सभा होत आहे. या सभेला महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शिवसैक उपस्थित झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेवर विरोधकांनी कडाडून टीका करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने आपल्या ट्विटर अकौंटवरून उद्धव ठाकरेंच्या सभेवर हिंदी कवितेतून टोमणा लगावला असून त्यांच्या आजच्या सभेला फुसकी सभा म्हणून संबोधले आहे.
वह जिसने घर नहीं छोड़ा
वह क्या मैदान में उतरेगा
देखा तुम्हारा असली चेहरा
कोई बच्चा भी नहीं डरेगा
जय महाराष्ट्र
आज फुस्की सभा
दरम्यान, आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा देणारे ट्विट केले होते. यात त्यांनी आता पुन्हा एकदा मैदानात उतरणे आवश्यक आहे. कारण काही लोक विसरले आमचा हिसका विसरले आहेत. जय महाराष्ट्र. आज क्रांतिकारी दिवस!, असे म्हणत अप्रत्यक्षपणे मनसे, भाजपला टोला लगावला होता.
लगता है फिरसे उतरना
पडेगा मैदान में दुबारा:
कूछ लोग भूल गये है..
अंदाज हमारा!!!
जय महाराष्ट्र!
आज क्रांतिकारी दिवस!!