पुणे: मार्केट यार्डातील भुसार बाजारात मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे बहुतांश जिनसांचे भाव स्थिर आहेत. गहू आणि ज्वारीचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाला क्विंटलला 200 रुपये कमी भाव मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत गहू, ज्वारी आणि तांदळाचे भाव स्थिर आहेत.
उन्हाळ्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे. शीतपेय बनविण्यासाठी साखरेला मागणी आहे. मागणी असली तरीही भाव मात्र स्थिर असल्याचे या वेळी सांगण्यात आले. सध्या मार्च महिना सुरू आहे. त्यातच अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यवहारावर झाला आहे. व्यवहार कमी झाला आहे.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते. साखर (प्रतिक्विंटल) 4000-4050 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):-
शेंगदाणा तेल 2600-2780, रिफाईंड तेल 2130-3080, सरकी तेल 2000-2300, सोयाबीन तेल 1930-2250, पामतेल 1930-2130, सूर्यफूल रिफाईंड तेल 2190-2310, खोबरेल तेल 4300 वनस्पती 1850-2300 रु.
तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु.
गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-3800, नं.3 3075-3400, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु.
ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु.
बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300 रु.
गूळ :- गूळ नं. 1 4400-4550, गूळ नं.2 4250-4350 गूळ नं.3 4100-4200, एकष्ट्रा 4600-4700, बॉक्स 4200-5300 रु.
डाळी:- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 6600-6700, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7200-7300, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु.
कडधान्ये:- हरभरा 5800-6000, हुलगा 4800-5000 चवळी 7000-9000, मसूर 6600-6700, मूग 9000-9200, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6400-6500, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 14000-1420, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 4500-4600, काबुली चणा 7000-11000 रु.
साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु.
वरई भगर :-11000-13000, सावा भगर 10000-11000 रु. गोटा खोबरे 3200-3400 रु.
शेंगदाणा :- जाडा 10500-11000, स्पॅनिश14500-15000, घुंगरु 13500 टीजे 10500 रु.
धने :- गावरान 11000-12000, इंदूर 14000-16000 इंदुर सुपर 25000-30000 रु.
पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पांहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 5500-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु.
रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1750-1800, रवा 1750-1800, मैदा 1750-1800, बेसन:- (50 किलोस) 4100-4400 रु.
मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 300, मीठ दळलेले (50 किलोस) 350 रु.
मिरची : काश्मीरी ढब्बी 6000-65000, ब्याडगी 35000-50000, लवंगी तेजा 21000-22000, गुंटूर 23000- 25000, खुडवा गुंटूर 11000-13000, खुडवा ब्याडगी 13500-14000 रु.
नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 2100-2300, मद्रास 4500-5000, पालकोल जुना 2500-2600, सापसोल 4500-5200 रु.