Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Supply Disruption: पुण्यात सलग तीन दिवस पाणीपुरवठ्याचा खोळंबा; मध्यवर्ती पेठांसह उपनगरांना कमी दाबाने पाणी

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील केबल बिघाड आणि खडकवासला पंपिंग स्टेशनमधील रोहित्रे नादुरुस्त; दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत यंत्रणेत सलग तीन दिवस झालेल्या तांत्रिक बिघाडांचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. गुरुवारी नियोजित पाणीबंद, शुक्रवारी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील केबल बिघाड आणि शनिवारी खडकवासला पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक भागांत पाण्याचा दाब कमी झाल्याने मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद होता. त्यात शुक्रवारी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत केबलमध्ये बिघाड झाल्याने ३५० एमएलडी क्षमतेचे जुने जलशुद्धीकरण केंद्र चार तास बंद ठेवावे लागले. दुरुस्तीनंतर ही यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, शनिवारी खडकवासला पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारी महावितरणची एक्स्प्रेस फीडर केबल बांधकामादरम्यान तुटली. पर्यायी वीजपुरवठा सुरू केल्यानंतर ओव्हरहेड वाहिनीच्या संपर्कात माकड आल्याने शॉर्टसर्किट झाले. त्यात पंपिंग स्टेशनमधील दोन रोहित्रे नादुरुस्त झाली.

परिणामी, वारजे जलशुद्धीकरण केंद्राला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पंपिंगवर परिणाम झाला. महापालिकेने तातडीने जनरेटर सुरू करून पाचपैकी चार पंप कार्यान्वित ठेवले. त्यामुळे ८० टक्के क्षमतेने पाणी उपसा सुरू ठेवता आला. दरम्यान, खासगी पुरवठादाराकडून प्रत्येकी १२०० केव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यापैकी एक रोहित्र बसवून सुरू केले आहे. उर्वरित रोहित्र बसविण्याचे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. ज्या भागांना फटका बसला, त्या भागांना प्राधशहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद होता. त्यात शुक्रवारी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत केबलमध्ये बिघाड झाल्याने ३५० एमएलडी क्षमतेचे जुने जलशुद्धीकरण केंद्र चार तास बंद ठेवावे लागले. दुरुस्तीनंतर ही यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, शनिवारी खडकवासला पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारी महावितरणची एक्स्प्रेस फीडर केबल बांधकामादरम्यान तुटली. पर्यायी वीजपुरवठा सुरू केल्यानंतर ओव्हरहेड वाहिनीच्या संपर्कात माकड आल्याने शॉर्टसर्किट झाले. त्यात पंपिंग स्टेशनमधील दोन रोहित्रे नादुरुस्त झाली.

परिणामी, वारजे जलशुद्धीकरण केंद्राला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पंपिंगवर परिणाम झाला. महापालिकेने तातडीने जनरेटर सुरू करून पाचपैकी चार पंप कार्यान्वित ठेवले. त्यामुळे ८० टक्के क्षमतेने पाणी उपसा सुरू ठेवता आला. दरम्यान, खासगी पुरवठादाराकडून प्रत्येकी १२०० केव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यापैकी एक रोहित्र बसवून सुरू केले आहे. उर्वरित रोहित्र बसविण्याचे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. ज्या भागांना फटका बसला, त्या भागांना प्राधान्य देऊन अतिरिक्त वेळ पंपिंग करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांना वितरणव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

मध्यवर्ती पेठांसह उपनगराला फटका

या तांत्रिक बिघाडामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर मध्यवर्ती पेठांचा परिसर, स्टेशन परिसर, खराडी, वडगाव शेरी, भांडारकर रस्ता, कोथरूडचा काही भाग, कर्वेनगर, शिवाजीनगर आणि औंध परिसरातील नागरिकांना कमी दाबाने व उशिरा पाणी मिळत आहे.ान्य देऊन अतिरिक्त वेळ पंपिंग करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांना वितरणव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT