Police Pudhari
पुणे

Pune Police Constable Extortion Case: कारवाईची भीती दाखवून मोटारचालकाकडे ५ हजारांची मागणी; पोलिस शिपायाला अटक!

वारजेतील डुक्करखिंड परिसरात महामार्गावर कार अडवून पैशांची मागणी; मोटारचालकाच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कारवाईची भीती दाखवून मोटारचालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला वारजे पोलिसांनी अटक केली. बाबूराव पोपट ढोले (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.

याप्रकरणी, मोटारचालक शिवकुमार बच्चूलाल सरोज (वय २३, रा. अचलपूर, प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ढोले याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सराजे हे (दि.२९) रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी डुक्करखिंड परिसरात पोलिस शिपाई ढोले याने मोटार अडविली. मोटारचालक सरोज याला धमकावले.

कारवाईची भीती दाखविली, तसेच माेटार जप्त करण्याची धमकी दिली. सराेज याला धमकावून पोलिस शिपाई काळे याने पाच हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या सरोज यांनी वारजे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले. चौकशीत मोटारचालकाला धमकावून पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आल्यानंतर अटक करण्यात आली. ढोले याची नेमणूक मुख्यालयात आहे. असे असताना देखील तो महामार्गावर पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT