खडाखडी प्रभाग क्रमांक : २६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी
आठ वर्षांनी निवडणुका होणार असल्याने अनेक जण रिंगणात तब्बल आठ वर्षांनी यंदा महापालिका निवडणुकांचे पडघम वाजल्यामुळे वेटिंगमध्ये असलेले सर्वच पक्षांतील इच्छुक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची माजी नगरसेवकांशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा फक्त चार असल्या, तरी उमेदवार मात्र पन्नासपेक्षा जास्त संख्येने, असेच चित्र प्रभाग क्रमांक २६ मध्ये पाहावयास मिळत आहे.(Latest Pune News)
पूर्वी महापालिकांच्या निवडणुकांत इतका मोठा खंड या आजवर पडला नाव्हता. २०१७ मध्ये निवडणूक झाली, त्यानंतर कोरोना महामारीमुळे विकास कामांना खीळ बसली. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले. त्याचा फटका अनेकांना निधी वितरणात बसला. त्यातच २०२२ मध्ये नगरसेवकांचा कालावधी समाप्त झाला. त्यामुळे तीन वर्षे प्रभागांना नगरसेवक नव्हते. प्रशासकराज आल्याने नगरसेवकांना कुणी विचार नव्हते, बांडांतील कामे रखडली होती. त्यामुळे 'अब की बार मेच लढुंगा' म्हणत माजी नगरसेवकांनी, तसेच प्रभागातील पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी दंड थोपटले आहेत.
भाजप: अजय खेडेकर, सम्राट थोरात, आरती कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर या माजी नगरसेवकांसह राजेंद्र कोंढरे, अॅड. राणी कांबळे, डॉ. गणेश परदेशी, सागर पेटाडे, रमेश जगताप, छगन बुलाके, काँग्रेस माजी महापौर कमल व्यवहारे, अॅड. शब्बीर खान, अयुब पठाण किंवा त्यांची पत्नी, रवी पाटोळे, नारायण चव्हाण, रईस शेख, अॅड. सुषमा बोराटे. राष्ट्रवादी काँग्रेस : विजय ढेरे, गणेश कल्याणकर, विशाल कांबळे, राजू घडे किंवा आई, शिवसेना (उबाठा): रूपेश पवार किंवा पत्नी, संभाजी गायकवाड, शिवसेना (एकनाथ शिंदे): बाळासाहेब मालुसरे, साकीब आबाजी, मनसे रवी ससाणे किंवा पत्नी, प्रवीण क्षीरसागर, आशिष साबडे, वसंत खुटवड, अपक्ष रूपेश केसेकर ही नावे चर्चेत आहेत.
नगरसेवकपदासाठी पोस्टरबाजी २०२२ पासूनच सुरूच आहे. त्यासोबत समाज माध्यमांचा जोरदार वापर सुरू झाला आहे. बॉडर्डातील रखडलेल्या कामांचे फोटो तरुण इच्छुक व्हायरल करीत प्रशासनाला जाब विचारत आहेत. तसेच घराघरांत सर्वच इच्छुक विविध प्रकारचे साहित्य, भेटवस्तू पाठविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकेल, याची गॅरंटी नाही, अशा गष्या प्रभागात रंगल्या आहेत.
या प्रभागात चार जागांसाठी अनेक उमेदवारांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात सर्वच पक्षांतील जुन्याजाणत्या आणि ज्येष्ठ उमेदवारांसमोर त्यांच्याच पक्षातील तरुण इच्छुकांचे आव्हान आहे. या वेळी आठ वर्षे वाट पाहिल्याने माघार न घेता आपले नशीच आजमावून तर पाहू, अशा विचाराने अनेकांनी प्रचारात उडी घेतली आहे.
प्रभाग क्रमांक २६ मध्ये फिरताना असे लक्षात येते की, येथे हिंदू बहुसंख्य असला, तरीही मुस्लिम मतदारांचे मतदान १३ ते १८ हजारांच्या दरम्यान आहे. हिंदू मताचे विभाजन आजवर मोठ्या संख्येने झाल्याने मुस्लिम मतदारांची मते ज्याला चांगली मिळतील तीच ठरणार बाजीगर, असे गणित होते. त्यामुळे आजवर हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, २०१७मध्ये दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी सूत्रे हाती घेक्लो अन् या प्रभागात प्रथमच भाजपचे चारही उमेदवार निवडून आले. यात अजय साडेकर (खुला गट), सम्राट थोरात (खुला गट), आरती कोंढरे (ओबीसी), विजयालक्ष्मी हरिहर (अनुसूचित जाती) के उमेदवार अटीतटीच्या लढतीत निवडून आले अन् करिसचा बालेकिल्ला भाजपने ताब्यात घेण्यात यश मिळविले.