Vegetable Pudhari
पुणे

Pune Vegetable Market Rates: गणपती-गौराईच्या नैवेद्यामुळे पडवळ, हिरवी मिरची महागली; पुणे मार्केट यार्डात १० ते १५ टक्के वाढ

आवक घटल्याने पडवळ आणि हिरव्या मिरचीला उठाव; शेपू, चुका, पुदिनाही महागला, कांदापातीचे दर मात्र घसरले

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात हिरवी मिरची आणि पडवळची आवक रविवारी घटली. गौराई आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी पडवळला विशेष पसंती मिळत असल्याने बाजारात त्याला चांगली मागणी राहिली. दुसरीकडे, पुणे विभागातील स्थानिक बाजारपेठांमध्ये हिस्च्या मिरचीला चांगला दर मिळत असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तिची आवक कमी झाली आहे.

परिणामी, उपलब्ध मालाच्या तुलनेत मागणी अधिक राहिल्याने पडवळ आणि हिस्ख्या मिरचीच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित फळभाज्यांची आवक आणि मागणी यामध्ये विशेष बदल नसल्याने त्यांचे दर स्थिर राहिले. रविवारी (दि. १३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक मार्केट यार्डात झाली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक गुजरात येथून हिस्वी मिरची १५ टोपी, कर्नाटक येथून कोबी ४ ठेम्पो, हिमाचल प्रदेश व कर्नाटकातून घेवडा ३ ते ४ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून मुईमूग शेंग ३ ते ४ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० ते १२ टैम्पो, कर्नाटक येथून घेवड़ा ३ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू रोखून शेवगा ३ ते ४ टेम्पो, बंगळूर येथून २ टेम्पो आले, तोतापुरी ४० केट, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० टेम्पो, इंदूर, आया येशून बटाटा ५० टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आचकमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो १० हजार केट, हिरवी मिरची ४ टेम्पी, काकडी ५ टेम्पो, फनींवर १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार ५००, घेवडा २ ते ३, पावटा २ यो, शेवगा २ ते ३ टेम्पो, कांदा सुमारे ८० टैम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट याहर्यातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

शेपू, पुदिना, चुका महाग

तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली होती. मात्र, आवक वाढूनही मागणी अधिक राहिल्याने शेपू आणि चुकाच्या भावात शेकड़ा जुहीमागे २०० रुपयांची, तर पुदिन्याच्या भावात शेकहा जुद्रीमागे ५०० रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे, आवक वाढल्याने केवळ कांदापातीच्या भावात शेकडा जुडीमागे ५०० रुपयांची घट झाली. इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. रविवारी मार्केट याति कोथिबिरीची सुमारे २ लाख जुडी, तर मेथीची ७० हजार जुडी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT