Pune Market Rates: श्रावण संपताच शेंगदाणे स्वस्त; साखरेची घसरणही कायम, गहू-ज्वारी महागली

गुलटेकडी मार्केट यार्डात शेंगदाणे किलोमागे ५, खोबरे २० रुपयांनी स्वस्त; गणेशोत्सवामुळे गूळ-नारळाला मागणी, मात्र दर स्थिर
Peanut
PeanutPudhari
Published on
Updated on

पुणे: श्रावण महिना संपताच शेंगदाण्याची मागणी कमी झाली असून, त्याच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी घट झाली आहे. त्यातच पुढील २० दिवसांत शेंगदाण्याचे नवीन पीक बाजारात दाखल होण्याची शक्यता असल्याने दरावर आणखी दबाव निर्माण झाला आहे. खोबऱ्याच्या भावातही किलोमागे २० रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, साखरेच्या भावातील घसरण सलग तिसऱ्या आठवड्यातही कायम राहिली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साखरेच्या भावात पहिल्या आठवड्यात किलोमागे १५ रुपये, दुसऱ्या आठवड्यात पाच रुपये, तर तिसऱ्या आठवड्यात दीड ते दोन रुपयांची घट झाली. आता साखरेचे भाव स्थिरावण्याची शक्यता असल्याची माहिती साखरेचे व्यापारी मुकेश गोयल यांनी दिली.

Peanut
Pune Fish Market Rates: श्रावण संपताच पुणेकरांची मासळीला पसंती; पापलेट, सुरमई, रावसचे भाव तेजीत

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गूळ आणि नारळाला मोठी मागणी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरेसा पुरवठा होत असल्याने दोन्हींचे भाव स्थिर आहेत. दुसरीकडे, उत्पादक भागात पावसाने ओढ दिल्याने आवक घटली असून, गहू आणि ज्वारीच्या भावात किलोमागे ५० पैशांची वाढ झाली आहे. श्रावण संपल्याने शेंगदाण्याची मागणी कमी झाली आहे. तसेच नवीन पीक बाजारात येण्यास अवघे २० दिवस शिल्लक असल्याने शेंगदाण्याच्या भावात किलोमागे पाच रुपयांची घट झाली. खोबऱ्याच्या भावातही किलोमागे २० रुपयांची घसरण झाल्याची माहिती व्यापारी समीर भोजणी यांनी दिली. दरम्यान, मागणी आणि पुरवठ्यात समतोल राहिल्याने खाद्यतेल, तांदूळ, बाजरी, सर्व प्रकारच्या डाळी, रवा, आटा, मैदा, बेसन, साबुदाणा, भगर आणि लाल मिरचीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Peanut
Maharashtra Property Registration: महाराष्ट्राच्या मालमत्ता बाजाराला तेजी; ५ महिन्यांत २१.२३ लाख नोंदणी व्यवहार, महसुलात १६ टक्के वाढ

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) ४५५०-४६०० रु. खाद्यतेले (१५ किलो/लिटर) शेंगदाणा तेल २७५०-३०००, रिफाईंड तेल २६३०-३३००, सरकी तेल २५००-२९५०, सोयाबीन तेल २३००-२६००, पामतेल २३००-२६००, सूर्यफूल रिफाईंड तेल २५००-२७५०, खोबरेल तेल ४२००, वनस्पती २३००-२६२५ रु. तांदूळः- गुजरात उकडा ४३००-४८००, मसुरी ३४००-३६००, सोना मसूरी ५४००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७०००, लचकारी कोलम ७३००-७८००, चिन्नौर ७५००-७८००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००- ११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू लोकवन नं. १ ४२५०-४६००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२५०-३८००, सिहोर नं. १ ५९००-६७००, सिहोरी ३८५०-४५५०, मिलबर ३०५०-३१५० रु. ज्वारी :- गावरान नं. १५९००-६७००, गावरान नं. २ ५२००-५५००, नं.३ ४७५०-४९००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी:- महिको नं. १ ३४००-३७००, महिको नं. २ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ : गूळ नं. १५६०० ते५८००, गूळ नं.२ ५४०० ते ५५००, गूळ नं.३ ५००० ते ५३००, बॉक्स ५००० ते ७००० रु.

Peanut
Pune Ukadiche Modak: पुण्याचा उकडीचा मोदक सातासमुद्रापार! सिंगापूर, लंडन, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत ६० हजार मोदकांची मागणी

डाळी:- तूरडाळ १००००-१३०००, हरभराडाळ ७७००-८२००, मूगडाळ २०००-१००००, मसूरडाळ ७६००-७८००, मटकीडाळ १०००-१०५००, उडीदडाळ १००००-१२५०० रु. कडधान्ये: हरभरा ७७००-८०००, हुलगा ६६००-७६००, चवळी ८५००-१०७००, मसूर ७७००-८५००, मूग २६००-१२५००, मटकी गावरान १५०००-१७०००, मटकी पॉलिश ९४००-९८००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ८८००-२२००, मटकी सेलम १७५००-१८५००, वाटाणा हिरवा ५२००-५९००, वाटाणा पांढरा ५७००-६२००, काबुली चणा ८२००-११४०० रु. साबुदाणा : साबुदाणा नं. १८०००, साबुदाणा नं.२ ७८००, साबुदाणा नं.३ ७५०० रु. वरई भगर :- २००००-२१५००, सावा भगर १२०००-२०००० रु. गोटा खोबरे ३३०००-३६०० रु. शेंगदाणा :-जाडा ११०००-१२२००, स्पॅनिश-१४०००-१५०००, घुंगरु १२५००-१३५०० धने:- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु.

Peanut
Pune Rainfall 2026: देश दुष्काळाच्या सावटात, पण पुणेकर भाग्यवान! जुलैच्या २४९ टक्के पावसाने धरणे भरली

पोहे:- मध्य प्रदेश ४६००-४९००, पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (२किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा (५० किलोचा भाव) आटा १६५०-१७५०, रवा १७००-१८००, मैदा १७००-१८००, बेसन:- (५० किलोस) ४४००-४९५० रु. मिरची: काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु. नारळ (शेकडयाचा भाव): नवा पंकिंग २४००-२६००, मद्रास ४२००-४५००, पालकोल जुना २६५०-२८००, सापसोल ३२००-४८०० रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news