

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, परवल, लसूण, रताळी आणि हिख्या मिरचीचे भाव तेजीत होते. राजकोटच्या भुईमूग शेंगांची मोठी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव गडगडले. एकूण उलाढाल ५ कोटी ७५ लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक १ हजार ८४० क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव १,५०० ते ५,००० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,७१० क्विंटल झाली. बटाट्याला कमालभाव १,५५० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ४५ क्विंटल झाली. लसणाला कमालभाव १७ हजार ५०० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला १ हजार ५०० रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:
कांदा एकूण आवक-१,८४० क्विंटल. भाव क्रमांक- १.५,००० रुपये, भाव क्रमांक २. ३,८०० रुपये, भाव क्रमांक ३.१,५०० रु. बटाटा-एकूण आवक १,७१० क्विंटल. भाव क्रमांक १.१,५५० रुपये, भाव क्रमांक २.१,२५० रुपये, भाव क्रमांक ३.७०० रुपये.
फळभाज्या:
एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढील प्रमाणे टोमॅटो ३२७ क्विंटल (८०० ते १,८००), कोबी २३५ क्विंटल (७०० ते १,५००), फ्लॉवर- १९२ क्विंटल (१,००० ते २,०००), वांगी - ८८ क्विंटल (१,५०० ते २,२००), भेंडी- १३८ क्विंटल (१,००० ते २,३००), दोडका - ७२ क्विंटल (१,५०० ते ४,०००), कारली - ७५ क्विंटल (२,००० ते २,८००), दुधीभोपळा- ७५ क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी- ७३ क्विंटल (१,००० ते २,५००), फरशी- ६२ क्विंटल (२,००० ते ३,५००), वालवड- ७६ क्विंटल (१,००० ते ३,०००), ढोबळी मिरची- १४२ क्विंटल (१,००० ते २,०००), चवळी ६७ क्विंटल (२,००० ते ३,२००), शेवगा - ४८ क्विंटल (३,००० ते ३,८००), गाजर- १४७ क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार- ७२ क्विंटल (४,००० ते ६,५००), आले- १९५ क्विंटल (६,००० ते १३,५००), रताळी- ४६ क्विंटल (३,००० ते ३,५००), वाटाणा- ९५ क्विंटल (५,००० ते ७,५००), भुईमूग शेंगा- ६७क्विंटल (४,००० ते ५,२००),
पालेभाज्या:
पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- मेथी- एकूण १६ हजार ३५२ जुड्या (४०० ते १,२०० रुपये), कोथिबीर-एकूण ३३ हजार ७२० जुड्या (३०० ते १,००० रुपये), शेपू- एकूण ४ हजार ५२० जुड्या (३०० ते ८०० रुपये), पालक- एकूण ५ हजार १२० जुड्या (४०० ते १,००० रुपये).
जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६० जर्सी गायींपैकी ५५ गाींची विक्री झाली. (१५,००० ते ७०,००० रुपये), ८५ बैलांपैकी ५८ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ४०,००० रुपये), १४० म्हशीं पैकी १२५ म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रुपये), ७,१६० शेळ्या-मेंढ्यापैकी ६,५४० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.